‘त्या’ महिलेच्या डोक्यात दगड घालणारा आरोपी रिक्षाचालकच; पोलिसांनी गुन्ह्याचा असा लावला तपास…
हजार रुपये देण्यावरून त्यांच्यामध्ये वाद होऊन रिक्षाचालकाने महिलेच्या डोक्यात सिमेंट क्राँक्रीटचा दगड घालून महिलेला ठार केल्याचे त्याने सांगितले.
नवी मुंबई : प्रवासी महिलेच्या डोक्यात सिमेंट काँक्रीटचा दगड घालून तिला ठार मारणाऱ्या रिक्षाचालक असणाऱ्या आरोपीस नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अडवली भुतवली गावाजवळ डोंगराळ भागात निर्जनस्थळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेच्या डोक्यात अज्ञाताने सिमेंट कॉंक्रीटचा दगड डोक्यात घालून महिलेची हत्या करणाऱ्या रिक्षाचालकाविरुद्ध तुर्भे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा महिलेच्या डोक्यात दगड घालून ठार करणाऱ्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले होते.
या गुन्ह्याबद्दल वरिष्ठ पातळीवरून तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते.त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त तुर्भे विभाग गजानन राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पाच तपास पथकं तयार करून या गुन्ह्याचा शोध लावण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी ज्या ठिकाणी घटना घडली त्या परिसरातील सलग तीन दिवसाच्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपास केला.
त्यानंतर संशयित वाहनांच्या नोंदी घेऊन त्यांची छाननी केली असता त्यामध्ये एका रिक्षामधून एक महिला व रिक्षाचालक घटनास्थळाकडे जात असल्याचे दिसून आले.
त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून संबधित रिक्षाचा नंबरही प्राप्त करण्यात आल. त्यानंतर रिक्षाचालक मोहम्मद अहमद मोहम्मद अली राईन (वय 36) याला शिळफाटा, ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यची त्याने कबुली दिली.
या गुन्ह्यातील मृत महिलेसोबत आरोपीने शरीरसंबंध ठेवले होते. त्यानंतर त्या मोबदल्यात मृत महिलेने आरोपीकडे 1 हजार रुपयांची मागणी केली होती.
त्यानंतर त्या हजार रुपये देण्यावरून त्यांच्यामध्ये वाद होऊन रिक्षाचालकाने महिलेच्या डोक्यात सिमेंट क्राँक्रीटचा दगड घालून महिलेला ठार केल्याचे त्याने सांगितले.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला .