AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे 35 वर्षांपासून सुरू असलेला बँड बंद, पोटासाठी नवी मुंबईच्या रस्त्यावर ट्रंपेट वादन 

गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत रस्त्यावर फिरुन ते आपली उपजीविका करत आहेत. आपल्या परिवारला घेऊन ट्रंपेट वाजवत ते नवी मुंबईत फिरत असतात.

कोरोनामुळे 35 वर्षांपासून सुरू असलेला बँड बंद, पोटासाठी नवी मुंबईच्या रस्त्यावर ट्रंपेट वादन 
Shree Music Band
| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 1:40 PM
Share

नवी मुंबई : राज्यात कोरोना विषाणूमुळे अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहे. कोरोनाची त्सुनामी आता प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागली आहे. कोरोनामुळे अनेक लहान-सहान व्यवसाय हे केव्हाच बुडून गेले आहेत. तर शासनाने सभा- लग्न समारंभांवर बंदी घातल्याने ऐन लग्न हंगामातही कार्यक्रमांचे विडे मिळत नाही. त्यामुळे बँड व्यवसायाचाच ‘बँड’ वाजला आहे. (Shree Music Band Business completely stop due to corona Unemployment crisis in businesses)

सातारा जिल्ह्यातील वसंत पवार यांनाही कोरोनामुळे बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. सध्या त्यांच्या परिवाराची उपासमार होताना दिसत आहे. तसेच त्यांच्या मुलांचे अपघाती निधन झाल्यावर नातवंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली. सध्या त्यांच्या परिवारातील सात जणांची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे.

नवी मुंबईत रस्त्यावर ट्रंपेट वादन

गेल्या 35 वर्षांपासून ते स्वतःचा व्यवसाय करतात. त्यांचा श्री म्युझिकल नावाचा बँड आहे. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना सातारा सोडून नवी मुंबईत यावे लागले. गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत रस्त्यावर फिरुन ते आपली उपजीविका करत आहेत. आपल्या परिवारला घेऊन ट्रंपेट वाजवत ते नवी मुंबईत फिरत असतात.

तर दुसरीकडे त्यांच्या बँड पथकातील अनेक कलाकार हे कामाविना घरीच हतबल होऊन बसले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.

शासनाकडून लक्ष देण्याची मागणी

गेल्या 35 वर्षांपासून श्री म्युझिकल बँड सुरुर कंपनी यासारख्या अनेक पथकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. यासारख्या अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून नावलौकिक मिळवला आहे. या कुटुंबियांसोबतच 25 हून अधिक कलाकार पथकात काम करत होते. ते लग्न, यात्रा, सण, उत्सव, जयंती, महोत्सवाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचे. पण कोरोनामुळे कलाकारांवर घरातच बसण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात अनेक कुटुंबांची परवड होत आहे. त्यामुळे शासनाने कलाकारांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.

(Shree Music Band Business completely stop due to corona Unemployment crisis in businesses)

संबंधित बातम्या :

महागाई, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, कार्यकर्त्यांसह वर्षा गायकवाडांची नवी मुंबईत सायकल रॅली

नवी मुंबईत 107 कोटींहून अधिक रक्कमेची मालमत्ताकर थकबाकी, पालिकेकडून थेट मालमत्ता जप्तीच्या नोटीसा

नवी मुंबईत फळ मार्केटमध्ये गाडीत स्फोट, एकाला अटक, दुसरा आरोपी रुग्णालयात

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.