नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, कोर्टात जाण्याचा भाजपचा इशारा

सोमवारी शेवटच्या दिवशी भाजपाच्यावतीने (Bjp) तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी (Election Commission) तथा महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे मोठ्या संख्येने हरकती आणि सूचना सादर करण्यात आल्या.

नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस, कोर्टात जाण्याचा भाजपचा इशारा
प्रभाग रचनेवर हजारो हरकती
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 3:54 PM

नवी मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (NMMC Elections 2022) तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये विशिष्ट राजकीय पक्षांना फायदा होत असल्याचा आरोप होत आहे. याविरोधात सोमवारी शेवटच्या दिवशी भाजपाच्यावतीने (Bjp) तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी (Election Commission) तथा महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे मोठ्या संख्येने हरकती आणि सूचना सादर करण्यात आल्या. दरम्यान पालिका मुख्यालयात आणि विविध प्रभाग कार्यालयांमध्ये 3852 हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई महापालिका प्रभाग रचनेवर सर्व पक्षांच्या हरकती आहेत. निवडणूक अयोग्य आणि नवी मुंबई महापालिकेने या हरकतींचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला पाहिजे. प्रभाग रचनेचा पुन्हा सर्वे करून ज्यांनी रास्त हरकती घेतल्या आहे. त्यांना न्याय दिला पाहिजे अशी भूमिका आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने नवीन प्रभाग रचना तयार करून ती 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध केली. नवीन प्रभाग रचनेत नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपाने केला आहे. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून विशिष्ट राजकीय पक्षाने त्याला फायदेशीर ठरेल अशी प्रभाग रचना करून घेतली आहे. दिघा, ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, बेलापूर व अन्य सर्व नोडमधील प्रभागांमध्ये सदोष प्रभाग रचना करण्यात आल्या आहेत असा आरोप आहे.

नियमबाह्य पद्धतीने विभाजनाचा आरोप

नियमबाह्य पद्धतीने दलित वस्त्यांचे विभाजन करण्यात आले आहे. त्यामुळे मागास वर्गीयांना प्रतिनिधित्व मिळणार नाही. माजी महापौर सुधाकर सोनावणे यांचा प्रभाग क्रमांक 11 हा थेट महापे पर्यंत नेण्यात आला आहे. भौगोलिक दृष्ट्या प्रभागांची रचना न करता ते सोयीस्कररित्या वाढवण्यात अथवा कमी करण्यात आले आहेत. यात गावे देखील विभागली गेली आहेत असे आरोप भाजपाने केले आहेत. 2011 च्या जनगणनेच्या आधारे प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. अनेक प्रभागांमध्ये जाणून बुजून बेकायदा बदल आणि सीमांकन करण्यात आले आहे. भाजपाच्या मातब्बर नगरसेवकांचे प्रभाग तोडण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. सदोष प्रभाग रचना विरोधात राज्यघटनेच्या कलम 226 अन्वये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची तरतूद उपलब्ध आहे. चुकीच्या आणि मनमानी पद्धतीने केलेली प्रभाग रचना जर दुरुस्त केली नाही, तर याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

प्रभागरचना पुन्हा बदलणार?

प्रभाग रचनेचे निकष उल्लंघन करून वस्त्यांचे आणि विशेष करून मागासवर्गीय वस्त्यांचे बेकायदा विभाजन करण्यात आले आहे. याचा मोठा परिणाम मागासवर्गीय अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात होणार आहे. इलठण पाडा, विष्णुनगर वस्तीचे तीन भागात विभाजन करण्यात आले आहे. आंबेडकर नगर वस्तीचे दोन ते तीन भाग चिंचपाड्याला जोडण्यात आले आहेत. पूर्वी हा संपूर्ण भाग प्रभाग 19 मध्ये होता. आंबेडकर नगर, भीम नगर, कातकरी पाडा, निबान टेकडी, गौतम नगर हे सर्व भाग भौगोलिक दृष्ट्या एकसंघ आहे. त्याचे दोन तुकडे केले असून एक भाग चिंचपाडा तर दुसरा भाग महापेला जोडला आहे. चिंचपाडासाठी ऐरोली तर महापेसाठी कोपरखैरणे प्रभाग कार्यालय आहे. नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. असा आरोप होत आहे.

राऊतांच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे का नव्हते? शिवसेनेतल्या अंतर्गत मतभेदावर चंद्रकांत पाटलांचं बोट

सोमय्या-राऊत वादात कोर्लईच्या सरपंचानं खरं खोटं सांगितलं, त्या 19 बंगल्याचं गौडबंगाल पहिल्यांदाच उघड

संजय राऊत हाणा मला, सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतले, भर प्रेस कॉन्फरन्समध्ये हायव्होल्टेज ड्रामा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.