TV9 Impact : मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये कामगारांकडून ओळखपत्रासाठी पैसे आकारणी, आता चौकशीचे आदेश
बाजार समिती निशुल्क ओळखपत्र देणार असे निश्चित होऊन देखील बाजार समितीच्या नाकावर टिचून ओळखपत्रासाठी कामगारांकडून 200 रुपये घेतल्याच्या प्रकाराची आता चौकशी होणार आहे.
नवी मुंबई : बाजार समिती निशुल्क ओळखपत्र देणार असे निश्चित होऊन देखील बाजार समितीच्या नाकावर टिच्चून ओळखपत्रासाठी कामगारांकडून 200 रुपये घेतल्याच्या प्रकाराची आता चौकशी होणार आहे. या प्रकारामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची मोठी बदनामी झाली आहे. याबाबत बाजर समितीचे आवाहन आणि पैसे घेणाऱ्यांचा व्हिडीओ दाखवून TV9 ने बातमी प्रसिद्ध करत पैसे घेणाऱ्यांचा पर्दाफाश केला. त्यामुळे बाजार समिती सभापती अशोक डक यांनी बातमीचे दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. चौकशीनंतर कामगारांकडून पैसे घेऊन बाजार आवारात ओळखपत्र बनवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे यामध्ये संचालक असतील तर त्यांचीही चौकशी होणार आहे (TV9 Marathi impact Inquiry order in illegal charges by lobours in APMC Navi Mumbai).
बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत महापालिका आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी ओळखपत्रासाठी शुल्कआकारणीचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतरही पैसे घेऊन ओळखपत्र देण्याचा कारनामा मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केट आवारात झाला. टीव्ही 9 मराठीने या प्रकाराला वाचा फोडल्यानंतर आता थेट चौकशी आणि कारवाईचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
बाजार समिती सचिवांनी सांगितल्यानुसार गुन्हा देखील दाखल होणार?
अशा प्रकारे ओळखपत्र देण्यासाठी पैसे घेण्याचे अधिकार कोणत्याही व्यक्ती अथवा असोसिएशनला देण्यात आले नव्हते. त्यामुळे कामगारांचे घेतलेले पैसे परत करून संबधित व्यक्तीवर कारवाई करणार असल्याचं मत सभापती अशोक डक यांनी व्यक्त केलं. शिवाय बाजार समिती सचिवांनी सांगितल्यानुसार गुन्हा देखील दाखल होणार असल्याची चर्चा मार्केट आवारात सुरु आहे. शिवाय रक्ताचे पाणी करून काबाडकष्ट करणाऱ्या माथाडी कामगारांकडून अशा प्रकारे पैसे घेतले असतील तर या प्रकारचा आम्ही निषेध करतो. शिवाय ज्यांच्या मेहनतीच्या जीवावर व्यापारी टिकून आहे, अशा लोकांचे पैसे परत करणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले.
नेमकं प्रकरण काय?
भाजीपाला मार्केटच्या संचालकांनी काही दिवसांपूर्वी ओळखपत्राला 200 रुपये घेणार असल्याचा मेसेज पाठवला होता. पैसे घेऊन ओळखपत्र देण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली असता संबंधित संचालकांच्या ए विंगमध्ये लेटरहेड घेऊन आलेल्या लोकांना पैसे देऊन ओळखपत्र वाटप सुरु होते. नियमाप्रमाणे कामगारांना विनाशुल्क, मोफत ओळखपत्र देणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी आरोपींकडून पैसे उकळण्यात आले.
हेही वाचा :
मुंबई APMC भाजीपाला मार्केट संचालकांचा अजब कारभार, कामगारांकडून ओळखपत्रासाठी पैसे घेण्याचे प्रकार
मुंबईच्या APMC मध्ये नियोजन शून्य कारभार, सभापतींच्या आदेशाला केराची टोपली, कोरोनाचा धोकाही वाढला
मुंबई एपीएमसीत मास्क घेण्यासाठी कोरोना नियम धाब्यावर, संचालकही फोटो काढण्यात मग्न
व्हिडीओ पाहा :
TV9 Marathi impact Inquiry order in illegal charges by lobours in APMC Navi Mumbai