लोकोपयोगी कामासाठी महाराष्ट्र मागं हटणार नाही, सोनोवालजी हमारी सरकार पिछे नही हटेगी : उद्धव ठाकरे
मुंबईला प्राधान्य दिल्या बद्दल केंद्रीय मंत्री सोनोवाल यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आभार मानतो असं म्हटलं. पहिली रेल्वे सेवा मुंबई ते ठाणे धावली. मुंबईत सुरू झालेली सुविधा देशात स्वीकारली जाते, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
नवी मुंबई: मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण आज करण्यात आलं आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री सर्वा सर्बानंद सोनोवाल,अजित पवार, (Ajit Pawar) एकनाथ शिंदे, अस्लम शेख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वॉटर टॅक्सीही (Water Taxi) देशात पहिली सेवा सुरू करत आहोत, असं म्हटलं. मुंबईला प्राधान्य दिल्या बद्दल केंद्रीय मंत्री सोनोवाल यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आभार मानतो असं म्हटलं. पहिली रेल्वे सेवा मुंबई ते ठाणे धावली. मुंबईत सुरू झालेली सुविधा देशात स्वीकारली जाते, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राचं महत्व ओळखून आरामार सुरू केलं. ब्रिटिशानी पुढं ते सुरू ठेवलं आणि मुंबई हे बेट तयार झालं. ही वॉटर टॅक्सी एलिफंटा लेणी आहेत तिकडेही जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पायाभूत सोयी सुविधा महत्वाच्या
पूर्वी वाशीचा पूल नव्हता. मुंबईतून पुण्याकडे कसं जायचं हा प्रश्न होता. नंतर नवीन पूल आला.मेट्रो, रेल्वे आधुनिक वाहतूक साधन आणि आता वॉटर टॅक्सी आली. आधुनिक काळात जलवाहतुक कडे वळतो आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे, कोस्टल रोड करत आहोत, सागरी मार्ग करत आहोत, शिवडी आणि नाव्हा शेवा जोडलं जाईल. एमएमआर रिजन मधील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. वॉटर प्लेन करायचं आहे. नवी मुंबई ही मुंबईच झाली आहे. पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत. मंदाताई म्हात्रे आणि राजन विचारे यांच्यासह ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला प्रधानसेवक म्हणतात. लोकोपयोगी कामासाठी महाराष्ट्र सरकार मागे हटणार नाही. आपलं सहकार्य सोबत असुद्या,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पाहा व्हिडीओ
महत्त्वाचे प्रकल्प धाडसाने सुरू करायचे आहेत : अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केलं.नैसर्गिक संकट येत असतात पण त्यातून मार्ग काढत आम्ही विकासाकडे भर देण्याचं काम आम्ही केलं. गेट वे ऑफ इंडियाकडून निघाल्यानंतर आमच्या बोटीचा वेग कमी होता. पण जर स्पीड बोटीने आल तर फक्त 35 मिनिटात पोहोचू.ही वाहतूक फार स्वस्त वाहतूक आहे, असं अजित पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्व खाली महाविकास आघाडी सरकार काम करत आहेत. अनेक संकट कोरोना, वादळ येतात मात्र त्या सगळ्याला सांभाळून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत.आधी आमच्या बोटीचा स्पीड कमी होता मात्र नंतर त्याचा स्पीड बरोबर झाला, 45 मिनिटात आम्ही इथे पोहोचलो आहे. सोनोवाल साहेब यांनी आम्हाला ही मदत केली आहे. अजून एक आमचा प्रकल्प आहे तो लवकरात लवकर सुरु व्हावा यासाठी आम्ही बोलत आहोत. मुख्यमंत्री देखील त्यावर लक्ष ठेऊन आहोत. काही महत्वाचे प्रकल्प आहेत आणि ते आपल्याला धाडसने सुरु करायचे आहेत. पर्यावरणाचा विचार करत लोकांसाठी सोईस्कर प्रवास दिला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.
हा विश्वास जो जनतेने टाकलेला आहे तो आपण सार्थकी लाऊयात.आणखी काही निर्णय घेण्याची गरज आहे.जगात सर्वात स्वस्त वाहतूक ही जलवाहतूक आहे. मोठमोठे रस्ते जरी झाले तरी त्यात अपघात होतात. जलवाहतुकीमध्ये जर काळजी घेतली तर अपघाताचे प्रमाण कमी राहते, असंही अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या :
वॉटर टॅक्सी प्रकल्पामुळं सागरी प्रवासाचा मार्ग सुकर होईल : एकनाथ शिंदे
नवी मुंबईकरांचा मुंबईला पोहोचण्याचा वेळ 30 मिनिटांवर, वॉटर टॅक्सीच्या लोकार्पणाचा कार्यक्रम