नवी मुंबईत 90 केंद्रांवर लसीकरण होणार, 5 दिवसानंतर 5 हजार कोविशिल्ड, 5 हजार कोवॅक्सिन लस प्राप्त
शहरात लस तुटवड्याचे संकट काही संपता संपत नाही. 5 दिवसानंतर 29 जुलैनंतर बुधवारी 5 हजार कोविशिल्ड आणि 5 हजार कोवॅक्सिन लस प्राप्त झाली असून गुरुवारी शहरातील 90 केंद्रावर पालिकेने लसीकरणाचे नियोजन केले आहे.
नवी मुंबई : शहरात लस तुटवड्याचे संकट काही संपता संपत नाही. 5 दिवसानंतर 29 जुलैनंतर बुधवारी 5 हजार कोविशिल्ड आणि 5 हजार कोवॅक्सिन लस प्राप्त झाली असून गुरुवारी शहरातील 90 केंद्रावर पालिकेने लसीकरणाचे नियोजन केले आहे.
मागील अनेक दिवसांपासून लसतुटवडा असून 5 दिवसानंतर लस मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये लस घेण्यासाठी उत्सुकता आहे. तिसऱ्या लाटेच्या भीतीने नागरिकांना लस हवी आहे. पण शासनाकडून सातत्याने लशीचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात गुरुवारी 29 जुलैनंतर लस मिळाल्याने शहरात आज लसीकरण होणार आहे.
पालिकेची नागरी आरोग्यकेंद्र, महापालिकेच्या शाळा, पालिकेची नेरुळ, ऐरोली, बेलापूर, तुर्भे येथील तसेच कामगार विमा रुग्णालय अशा 90 ठिकाणी लसीकरण होणार आहे.
नवी मुंबई शहरात 9 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. शहरात सातत्याने लशीचा तुटवडा जाणवत असून त्यामुळे पालिकेची लसीकरणासाठी व्यवस्था आहे, पण लस नाही अशी स्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांची मागणी वाढली आहे. फक्त लसप्रतीक्षाच करण्याची वेळ आली आहे.
नवी मुंबई महापालिकेला 29 जुलै नंतर 4 ऑगस्टला लस मिळाली आहे. त्यामुळे शहरात 90 लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार असल्याचे नवी मुंबई महापालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नवी मुंबईत टेस्टिंगवर भर, जुलै महिन्यात तब्बल 2 लाख 18 हजार चाचण्याhttps://t.co/E3ENz8K2wp#CoronavirusPandemic #Covid_19 #CoronaTest
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 2, 2021
संबंधित बातम्या :
पनवेल रेल्वे स्थानकात समस्यांचा पाऊस, स्टेशन मॅनेजर यांचे तत्काळ समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश