Navneet Rana Audio Clip : ‘मॅम हनुमान चालिसा सुनाईये प्लिज…’ नवनीत राणांना तरुणाचा आग्रह! राणा म्हणाल्या, ‘कानाखाली लावेन’
आता एक अजब प्रकार समोर आला आहे. कारण एक तरुण चक्क नवनीत राणा यांना फोन करुन हनुमान चालीसा ऐकवण्याचा आग्रह करत आहे. तर या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नवनीत राणा भडकल्याचे जाणवत आहे.
अमरावती : गुढी पाडव्याच्या सभेतून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशीदीवरील भोंग्यविरोधात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) चालवण्याची हाक दिली आणि तेव्हापासून राज्याचं राजकारण अजूनही हनुमान चालीसा भोवती फिरत आहे. सुरूवातील राज ठाकरेंच्या या भूमिकेला भाजपने भरभवरून पाठिंबा दिला. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी आपल्या राजकीय कार्यक्रमातही हनुमान चालीसा पठण केलं. त्यानंतर यात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांनी उडी घेतली आणि थेट मातोश्रीबाहेर आम्ही हनुमान चालीसा पठण करु अशी हाक दिली. त्यानंतर शिवसेना राणा दाम्पत्याविरोधात आक्रमक झाली. यातूनच राणा दाम्पत्याची जेलवारी झाली. हा वादही दिल्लीपर्यंत पोहोचला. मात्र आता एक अजब प्रकार समोर आला आहे. कारण एक तरुण चक्क नवनीत राणा यांना फोन करुन हनुमान चालीसा ऐकवण्याचा आग्रह करत आहे. तर या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नवनीत राणा भडकल्याचे जाणवत आहे.
कथित व्हायरल ऑडिओ
ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
फोन करणारा तरुण : मॅम नमस्ते, मै पारीख साखरी बोल राहू नागपूर से…मॅम हनुमान मॅम हनुमान चालिसा सुनाईये प्लिज…सात लाख पल्बिक जुडी है लाईव्ह…मॅम फोन मत काटना, नाहीं…
नवनीत राणा : मै आपको अच्छे से समजा देती हूँ…
फोन करणारा तरुण : नहीं मॅम हनुमान चालीसा सुनने का था हमें, पुण्य का काम हैं…
नवनीत राणा : ओये ज्यादा बात नहीं करने का…बात समझ में आई क्या…
फोन करणारा तरुण : नहीं मॅम धमकी नहीं, गुंडा गर्दी नहीं. मै हनुमान जी की राम जी बात कर रहा हू आप गुंडागर्दी कर रहें हो मॅम…
नवनीत राणा : विरोध कर रहे थें….
फोन करणारा तरुण : विरोध नहीं करता हूँ मॅम…
नवनीत राणा : आप पुरी हनुमान चालीसा बोलो…
फोन करणारा तरुण :जय हनुमान ज्ञान गुन सागर…
नवनीत राणा : मारुंगी मै…इतना मारुंगी मै कान के नीचे…
फोन करणारा तरुण : मॅम मिस्टेक हो गई हो तो मै सॉरी बोलता हूँ…
नवनीत राणा : इताना मारुंगी मै कान के नीचे, सब सहीं आ जायेगा तुझको…
फोन करणारा तरुण : मॅम पुण्य का का है, सात लाख पल्बिक सुन रहीं है…मॅ मै सुनाया ना आपको, मिस्टेक हो गया तो माफी माँगता हूँ…
प्रकरण पोलिसांत जाणार?
असा आशयाचा ऑडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्याकडूनही जोरदार प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. मात्र सध्याच्या राजकीय महौलमध्ये तरी या ऑडिओ क्लिपची चांगलीच चर्चा आहे. आता हे प्रकरण पोलिसांत जातं का? हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे.