झूठ बोले कौआ काटे, भाजपच्या काळात दंगली झाल्याच नाहीत, अनिल बोंडे खोटं बोलत असल्याचा मलिक यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटमध्ये अनिल बोंडे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप समाविष्ट आहे. यात अनिल बोंडे कसं खोटं बोलतायत, ते पहा, असं मलिक यांनी म्हटलं.

झूठ बोले कौआ काटे, भाजपच्या काळात दंगली झाल्याच नाहीत, अनिल बोंडे खोटं बोलत असल्याचा मलिक यांचा आरोप
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 12:49 PM

मुंबईः मंत्री नवाब मलिक यांनी अमरावतीतील भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यावर पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून घणाघाती हल्ला केला आहे. ट्विटरवर त्यांनी अनिल बोंडे यांच्या आवाजातील कथित ऑडिओक्लिप टाकली आहे. यात दंगली भडकावण्याचे काम भाजप नव्हे तर सेक्युलर पक्ष करतात, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे. अनिल बोंडे कसं खोटं बोलतायत, हे दाखवणारी ऑडिओ क्लिप नवाब मलिक (Navab Malik) यांनी टाकली आहे. अमरावतीत उसळलेल्या दंगल (Amravati Riots) प्रकरणी भाजप नेत्यांनी पैसा पुरवून हिंसक कारवाया घडवून आणल्या, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. तर महाविकास आघाडीनेच या दंगलींना पैसा पुरवल्याचा आरोप अनिल बोंडे आणि इतर भाजप नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी हे ट्विट केलंय.

ट्विटवरच्या ऑडिओ क्लिपमध्ये काय? राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विटमध्ये अनिल बोंडे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप समाविष्ट आहे. यात अनिल बोंडे कसं खोटं बोलतायत, ते पहा, असं मलिक यांनी म्हटलं. ऑडिओ क्लिपमधील मजकूर असा- ” गोंध्रा दंगलीनंतर गुजरात किंवा अहमदाबादमध्ये दंगल झालीच नाही. त्याआधी अहमदाबादमध्ये दरवर्षी दंगल ठरलेली असायची. पण मोदी सरकार सत्तेत आल्यापासून असे कृत्य झाले नाही. राज्यात फडणवीसांचं सरकार आलं, तेव्हाही दंगल झाली नाही. भाजपचं सरकार जिथं असतं, तिथे दंगल घडवण्याची हिंमत कुणीही करत नाही. पण ज्या ठिकाणी सेक्युलर किंवा डाव्या विचारसरणीचं सरकार येतं, त्या ठिकाणी दंगली होतात. कारण अशा हिंसक कारवाया करणाऱ्यांना नेत्यांकडून संरक्षण मिळलं. याआधीच्या पाच वर्षांच्या सरकारमध्ये कोणत्याही संवेदनशील भागात दंगे झाले नाहीत. ” ही ऑडिओ क्लिप अनिल बोंडे यांची असून त्यांनी किती खोटं बोललंय, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

अमरावती दंगल प्रकरणी भाजप नेत्यांना अटक दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमरावती पोलिसांनी शहरात घडलेल्या दंगल प्रकरणी अनेक भाजप नेत्यांना अटक केली. यात माजी मंत्री अनिल बोंडे यांनाही अटक करण्यात आली होती. काल 17 नोव्हेंबर रोजी भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. मात्र हिंमत असेल तर ज्यांच्या घरात खरोखरच्या तलवारी आहेत, त्यांना अटक करून दाखवा, असं आवाहान अनिल बोंडे यांनी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना दिलं होतं. 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसक कारवायांमुळे सध्या अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

इतर बातम्या-

निलंबनाच्या भीतीनं ST कर्मचाऱ्याकडून विष प्राशन, बुलडाण्याच्या विशाल अंबलकर यांचं अकोल्यात निधन

Nashik| ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपकडून महापालिकेत 2632 पदांची नोकर भरती

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.