AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करण्याच्या मागणीवर अजित पवार म्हणाले….

Ajit Pawar : नाशिक हिंसाचार प्रकरणात मविआच्या काही नेत्यांवर गुन्हा दाखल झालाय त्यावर अजित पवार म्हणाले की, "जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होईल. ती व्यक्ती कुठल्या गटाची, कुठल्या राजकीय पक्षाची आहे याच्याशी देणघेणं नाही. महाराष्ट्राची कायदा-सुव्यस्था चांगली राहिली पाहिजे. त्याला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, तर खैर ठेवली जाणार नाही"

Ajit Pawar : धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करण्याच्या मागणीवर अजित पवार म्हणाले....
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2025 | 11:07 AM

सध्या मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरु आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बोलले आहेत. सध्या राज्यात हिंदीवरुन टिकाटिप्पणी सुरु झाली आहे, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की, “सध्या कोणाला उद्योग नाहीय. मराठी आपली मातृभाषा आहे. त्याबद्ल कोणाचं दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली मातृभाषा असते, त्याबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असते. मातृभाषा टिकली पाहिजे” “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदी साहेबांनी दिला. खूप वर्ष दिल्लीत हे प्रकरण पडून होतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच धाडस कोणी दाखवलं नाही. ते एनडीएन आणि मोदी साहेबांनी केलं” असं अजित पवार म्हणाले.

“मराठी भाषा भवन मरीन ड्राइव्हला उभारण्यात येणार आहे. त्याचा प्लान तयार आहे. निधीची कुठलीही कमतरता जाणवणार नाही. जगात सर्वाधिक इंग्रजी भाषा बोलली जाते. तुमच्या आमच्या कोणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात रहायचं असेल, तर मराठी आलच पाहिजे. भारतात अनेक राज्यात हिंदी भाषा बोलली जाते. काही म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे. त्याच्यावर वाद आहे. पण मला त्या वादात शिरायच नाही. सध्या कोणाला उद्योग नाहीयत, काम नाहीयत. त्यामुळे ते अशा गोष्टींमध्ये वेळ घालवत आहेत” असं अजित पवार म्हणाले. “इंग्रजी ही जगातील बहुतेक देशात चालते. त्यामुळे ती पण भाषा आली पाहिजे. तिन्ही भाषांना महत्त्व आहे. पण मातृभाषेला नंबर 1 च स्थान आहे” असं अजित पवार म्हणाले.

बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतेय

संघाला हिंदी राष्ट्र बनवायच आहे, यावर अजित पवार म्हणाले की, “आज समोरच्या राजकीय पक्षांना मुद्दा राहिलेला नाही. आज खरतर उन्हाची तीव्रता आहे. उष्माघात आहे. तापमान वाढतय. बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होतेय. यंदा 103 ते 105 टक्के पाऊस कोसळले, असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे, पण तो पाऊस पडला पाहिजे”

धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करणार का?

धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करण्याची मागणी होतेय, त्यावर सुद्धा अजित पवार बोलले आहेत. “कोणी काय म्हणाव, उद्या इथे तुम्हाला मंत्री करा असं म्हणतील. मधल्या काळात जी घटना घडली, त्याची सीआयडी चौकशी सुरु आहे. पोलीस तपास सुरु आहे. एसआयटी नेमलेली आहे. या सगळ्याचा चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून घेतील” असं अजित पवार म्हणाले

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.