Ajit Pawar : गुलाबी जॅकेट शुभ की आणखी काही?… अजितदादा यांची पहिली प्रतिक्रिया काय?

राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्याचा सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाची जादू चालली नाही. त्यामुळे अजितदादा गटाने आता स्वत:ची ब्रँडिंग सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार हे रोज पिंक म्हणजे गुलाबी जॅकेटमध्येच दिसत आहेत. त्यावर टीका होताच अजितदादांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Ajit Pawar : गुलाबी जॅकेट शुभ की आणखी काही?... अजितदादा यांची पहिली प्रतिक्रिया काय?
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 12:45 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत आलेल्या यशामुळे तर ते चर्चेत आहेतच. पण त्यांच्या गुलाबी जॅकेटमुळेही ते चर्चेत आहेत. अजितदादा रोज गुलाबी जॅकेट घालत आहेत. विधान परिषद निवडणुकीत विजय मिळाला त्या दिवशी त्यांनी गुलाबी जॅकेट घातलं होतं. त्यानंतर त्यांनी रोज गुलाबी जॅकेट वापरण्याचा धडाकाच लावल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. गुलाबी जॅकेट शुभ आहे म्हणून ते परिधान करत आहेत का? अशी चर्चा रंगलेली असतानाच अजितदादा यांनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी गुलाबी जॅकेट घालण्यास सुरुवात केली आहे. रोज एकाच रंगाच्या जॅकेटमध्ये दादा दिसत असल्याने शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. अजितदादा रोज गुलाबी जॅकेट घालत आहेत. यामागे राज्याचं राजकारण गुलाबी करण्याचा त्यांचा हेतू दिसत आहे. पण तसं होणार नाही, असं सांगतानाच जॅकेट घालून राजकारण होत नसतं, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला होता. त्यावर अजितदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्या पैशाने पिंक जॅकेट घेतलं

मी माझ्या पैशाने पिंक जॅकेट घातलं. मी काय घालायचं हा माझा प्रश्न आहे. अमोल कोल्हे काय बोलले यावर उत्तर द्यायला मी बांधील नाही. मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी ब्रँडिंग प्रमोशन असलं काही करत नाही. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जे पटतं तेच करतो, असं अजितदादा म्हणाले.

18 पिंक जॅकेट घेतले?

दरम्यान, अजितदादा यांनी 18 गुलाबी रंगांची जॅकेट घेतल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर पक्षातील आमदार, खासदार, मंत्री आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांसह ग्रामीण स्तरावरील कार्यकर्त्यांना गुलाबी रंगाचा वापर करण्याच्या सूचना अजितदादा गटाने दिल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादांनी स्वत: सरकारी आणि पक्षांच्या बैठकांमध्ये गुलाबी रंगाचे जॅकेट घालण्यास सुरुवात केल्याचं सूत्रांनी सांगितलं. अजितदादांना गुलाबी रंग लाभदायक असल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अजितदादा गुलाबी रंगाचे जॅकेट घालणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

तीन कारणे…

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने अजितदादा आपली इमेज बदलण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच त्यांनी हा नवा प्रयोग केल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादांनी स्वभावातही बदल केल्याचं सांगितलं जात आहे. पूर्वी अजितदादा कार्यकर्त्यांशी कठोरपणे वागायचे. आता नरमाईचं धोरण स्वीकारताना दिसत आहेत.

अजितदादा गटाने निवडणूक रणनीती तयार करण्याची जबाबदारी डिझाईन बॉक्स या कंपनीला दिली आहे. या कंपनीने आधी डीके शिवकुमार आणि अशोक गेहलोत यांच्यासाठी निवडणूक रणनीती तयार केली होती. या कंपनीची या दोन्ही नेत्यांकडे पिंक थीम होती. त्यामुळेच या कंपनीने अजितदादांना पिंक रंगाचा वापर करण्यास सांगितल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. अजितदादांनीच ही घोषणा केली. त्यामुळे या योजनेचं क्रेडिट घेण्याचा अजितदादा गटाचा प्रयत्न आहे.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.