Ajit Pawar News | अखेर ठरलं जयंत पाटील कोणासोबत? त्यांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar News | जयंत पाटील कोणासोबत जाणार ते स्पष्ट झालय. त्यांनी स्वत:हा टि्वट करुन सांगितलं. जयंत पाटील यांची दोन-तीन तास कोणीतीच प्रतिक्रिया नव्हती. त्यामुळे संभ्रम निर्माण झालेला.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज फूट पडली. रविवारी दुपारच्या सुमारास राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, अशा बातम्या येऊ लागल्या. अखेर काही तासातच अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनावर शपथ विधीचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस उपस्थित होते.
राजभवनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मांदियाळी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल असे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राजभवनात होते. हे तिन्ही नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय, विश्वासू म्हणून ओळखले जातात.
अखेर या प्रश्नाच उत्तर मिळालं
राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना पाहून NCP मधील फूट किती मोठी आहे, ते लक्षात आलं. या सगळ्या नेत्यांमध्ये जयंत पाटील कुठे दिसत नव्हते. त्यामुळे जयंत पाटील नेमके कुठल्या बाजूला? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात होता. जयंत पाटील अजित पवारांसोबत की शरद पवारांसोबत असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या प्रश्नाच उत्तर मिळालं आहे.
भावनात्मक साद
मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बऱ्याच घडामोडी घडत होत्या. अजित पवार भाजपासोबत जातील, अशी चर्चा होती. त्यानंतर मे महिन्यात शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याच जाहीर केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भावनात्मक साद घातली. अखेर शरद पवारांनी आपलाा राजीनामा मागे घेतला.
मी साहेबांबरोबर… pic.twitter.com/npZZVEvKk2
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 2, 2023
प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा
त्यानंतर काही दिवसांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली. अजित पवारांकडे विरोधी पक्षनेते पद सोडल्यानंतर पक्ष संघटनेत पद नव्हतं. मागच्या तीन-चार दिवसांपासून अजित पवारांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होईल अशी चर्चा होती. त्यासाठी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवलं जाईल, असं बोललं जात होतं. जयंत पाटील म्हणाले….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या घडामोडी सुरु असताना अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात फारसा सुसंवाद दिसून येत नव्हता. त्यामुळे आज जयंत पाटील कुठल्या बाजूला असा प्रश्न निर्माण झाला होता? अखेर त्याचं उत्तर मिळालं आहरे. जयंत पाटील यांनी टि्वट केलय. त्यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याच जाहीर केलं.