AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

23-24 नोव्हेंबरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाबळेश्वरला मेळावा; शरद पवार, अजित पवार उपस्थित राहणार

येत्या 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी महाबळेश्वरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हजेरी लावणार आहेत.

23-24 नोव्हेंबरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा महाबळेश्वरला मेळावा; शरद पवार, अजित पवार उपस्थित राहणार
ncp youth congress
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 4:57 PM
Share

मुंबई :  सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धूम सुरु आहे. आगामी काळात पुणे, मुंबई तसेच इतर मोठ्या शहरांतील  महापालिका निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणीसाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी महाबळेश्वरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हजेरी लावणार आहेत.

मेळाव्याला शरद पवार, अजित पवार हजेरी लावणार

महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आलाय. येत्या 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला शरद पवार तसेच अजित पवार उपस्थित राहणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्वतः अजित पवार आणि शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.

मेळाव्याला राष्ट्रवादीचे बडे मंत्री उपस्थित राहणार

या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आगामी काळातील महापालिका निवडणुका तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पुढील वाटचाल यावर या दोन दिवसीय मेळाव्यात चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येईल. विशेष म्हणजे या मेळाव्याचा समारोप 24 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे मंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली

दरम्यान, आगामी काळातील महापालिका निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने योजना आखायला सुरु केली आहे. शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या स्थानिक नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. तसेच मुंबईतदेखील राष्ट्रवादी पक्षबळटीकरणासाठी पावले टाकत आहे. पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादीने खास जोर लावल्याचे दिसतेय. काहीही झालं तरी यावेळी राष्ट्रवादीचाच महापौर होणार असा दावा यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केला आहे.

इतर बातम्या :

12 तारखेची घटना निंदनीय, पण 13ची घटना त्यापेक्षाही निंदनीय, फडणवीसांचं विधान बेजबाबदारपणाचं; यशोमती ठाकूरांचा पलटवार

अनिल परबांना केबल कनेक्शन देण्याइतकं एसटीचं काम सोप्पं वाटतं का?; राधाकृष्ण विखे-पाटलांची खोचक टीका

12 तारखेची हिंसा डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर जोर का दिला जात आहे?, यशोमती ठाकूर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या...
ठाकरेंना जय महाराष्ट्र अन् भाजपात प्रवेश, तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या....
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?
संगमनेरमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात जनआक्रोश, मागणी काय?.
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?
'या' महापालिकेच्या निवडणुकीचा बार उडणार? बघा तुमची महापालिका आहे का?.
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.