Nidhi Jagtap | युक्रेनमधून परतलेल्या मुलीला बघून आईचे डोळे पाणावले

Nidhi Jagtap | युक्रेनमधून परतलेल्या मुलीला बघून आईचे डोळे पाणावले

| Updated on: Mar 01, 2022 | 3:30 PM

रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धात अनेक भारतीय विद्यार्थी (Students) अडकले आहेत. युक्रेनमधील एमबीबीएसला शिकणारी पुण्याची निधी जगताप सुखरूप परतलीय.

रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukraine) युद्धात अनेक भारतीय विद्यार्थी (Students) अडकले आहेत. युक्रेनमधील एमबीबीएसला शिकणारी पुण्याची निधी जगताप सुखरूप परतलीय. मात्र आम्ही होतो, त्यावेळी तिकडे भयानक परिस्थिती होती. मात्र इंडियन अॅबसीने केलेल्या सहकार्याने मी सुखरूप परतलीय. अजूनही माझे काही मित्र युक्रेनमध्ये अडकलेले आहेत, असं निधी जगतापने सांगितले. मुलगी सुखरूप परतल्यामुळे आईच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या मुलीप्रमाणे इतर मुलेही सुखरूप परतली पाहिजेत, असं निधीच्या आईने सांगितले. यासंदर्भात निधी आणि तिच्या आईशी टीव्ही नाइनने बातचीत केली. यावेळी निधीनं कशाप्रकारे सामना करावा लागला, सीमेपर्यंत येताना काय काय समस्यांचा सामना करावा लागला, याचे कथनच तिने केले. अनेक मित्र अजून अडकले आहेत. त्यांच्याशी संपर्क होताना अडचणी येताहेत. त्यांचीही लवकर सुटका व्हावी, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.