तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून नाईट कर्फ्यूचा निर्णय घ्या; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुख्य सचिवांची परवानगी घेऊन जिल्हाधिकारी संबंधित जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करु शकतील. | Night Curfew

तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून नाईट कर्फ्यूचा निर्णय घ्या; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 5:08 PM

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यानंतर आता वेळ पडल्यास मुंबई आणि अन्य महापालिका क्षेत्रांबाहेरही नाईट कर्फ्यू लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्य सचिवांची परवानगी घेऊन जिल्हाधिकारी संबंधित जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करु शकतील. (Night Curfew in Maharashtra on backdrop of new Covid Virus threat)

दरम्यान, आजपासून 27 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यू सुरु होणार आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे.

हॉटेल व्यावसायिकांनंतर व्यापारी आक्रमक, नाईट कर्फ्यूला विरोध

मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याच्या निर्णयाला हॉटेल व्यावयसायिकांनंतर व्यापाऱ्यांनी देखील विरोध केला आहे. आहार संघटनेनंतर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशनने मुंबईतील नाई कर्फ्यूला विरोध केला आहे. कोरोना विषाणूसोबत राज्य सरकारने व्यापाऱ्यांच्याही हिताचा विचार करावा, अशी मागणी एफआरटीडब्ल्यूओचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केली आहे.

हॉटेल व्यावसायिकांचाही विरोध

राज्य सरकारने 5 जानेवारीपर्यंत रात्रीच्या संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केलीय. हॉटेल सुरु ठेवण्यासाठी 11 ची वेळ दीड वाजेपर्यंत वाढवून द्यावी,अशी मागणी करण्यात आलीय. आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर हा व्यवसायाचा काळ असतो. या काळातच हॉटेल सुरु ठेवण्यास कमी वेळ मिळाला तर मोठे नुकसान होईल, असं शेट्टी यांनी सांगितले.

एकही प्रवासी थेट घरी सोडणार नाही, सक्तीने क्वारंटाईन करणार, BMC आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (Coronavirus new strain) आढळल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ब्रिटन (UK) आणि आखाती देशांतून (Middle East countries) मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोरोना चाचणी केली जाईल. तसेच या प्रवाशांना 14 दिवसांसाठी हॉटेल्स आणि इतर ठिकाणी क्वारंटाईन होणे सक्तीचे असेल. तर इतर देशांतून येणाऱ्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

संबंधित बातम्या:

नाईट कर्फ्युमुळे हॉटेल व्यावसायिक नाराज? शरद पवारांच्या भेटीला जाण्याची शक्यता

Maharashtra Night Curfew: महाराष्ट्रात आजपासून नाईट कर्फ्यू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

ब्रिटन, महाराष्ट्र आणि एक नेगेटीव्ह असलेली मोठी पॉझिटीव्ह बातमी

(Night Curfew in Maharashtra on backdrop of new Covid Virus threat)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.