Nilesh Lanke | 'BJPचं कटकारस्थान चुकीच्या पद्धतीनं, कधीतरी परिणाम भोगावे लागतील'

Nilesh Lanke | ‘BJPचं कटकारस्थान चुकीच्या पद्धतीनं, कधीतरी परिणाम भोगावे लागतील’

| Updated on: Feb 23, 2022 | 3:15 PM

जसा पाण्याविना मासा तशी सत्तेविना भाजपाची (BJP) अवस्था झाली आहे. आरोप, प्रत्यारोप, ईडीचा (ED) धाक दाखवणे हा केंद्रातील सत्तेचा गैरवापर आहे. ही चुकीच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल आहे, अशी टीका आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केली आहे.

जसा पाण्याविना मासा तशी सत्तेविना भाजपाची (BJP) अवस्था झाली आहे. आरोप, प्रत्यारोप, ईडीचा (ED) धाक दाखवणे हा केंद्रातील सत्तेचा गैरवापर आहे. ही चुकीच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल आहे, अशी टीका आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केली आहे. राजकारणात यश आणि अपयश या दोन गोष्टी असतात. अपयश आल्यानंतर आपण आपल्या चुका शोधायच्या असतात. आपण जनतेची काय सेवा करायला कमी पडलो, हा विचार करून त्यापद्धतीने सुधारणा केली पाहिजे पवार साहेब, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार आले. आता विरोधकांनी आपल्याला अपयश आले या भावनेने शांत राहिले पाहिजे, सत्तेच्या अशा गैरवापराचे परिणाम भाजपाला कधीतरी भोगावे लागतील, असेही लंके म्हणाले.