लोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या ‘गोंधळा’वर निलेश राणेंचा निशाणा

मुंबई :  कृषी विधेयकावर शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेतल्या दुटप्पी भूमिकेवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर निलेश राणेंनी हल्लाबोल केला आहे. “आधी नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि यानंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत  समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण काय”, असा सवाल त्यांनी विचारला आहे. (Nilesh […]

लोकसभेत समर्थन, राज्यसभेत विरोध; शिवसेनेच्या 'गोंधळा'वर निलेश राणेंचा निशाणा
Follow us
| Updated on: Sep 22, 2020 | 3:02 PM

मुंबई :  कृषी विधेयकावर शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेतल्या दुटप्पी भूमिकेवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर निलेश राणेंनी हल्लाबोल केला आहे. “आधी नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि यानंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत  समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण काय”, असा सवाल त्यांनी विचारला आहे. (Nilesh Rane Criticized Shivsena Stand On Agriculture Bill)

पहिल्यांदा CAA बिलाला आणि त्यानंतर कृषी बिलाला, दोन्ही वेळेला शिवसेनेने लोकसभेत समर्थन दिलं. मात्र राज्यसभेत या दोन्ही बिलाला विरोध केला याचं नेमकं कारण काय?  संजय राऊत यांना शिवसेनेचे लोकसभेचे खासदार किंमत देत नाही तसंच नेता मानत नाही, अशा शब्दात निलेश राणे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर तसंच राऊतांवर निशाणा साधला आहे.

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत, “आधी CAA नंतर कृषी बिल, दोन्ही वेळेला लोकसभेत समर्थन राज्यसभेत विरोध याचं कारण काय?, शिवसेनेचे  लोकसभेचे खासदार संजय राऊत यांना किंमत देत नाही व नेता मानत नाही. संजय राऊत 99 टक्के शिवसैनिकांना खटकतात म्हणून संधी मिळेल तेव्हा ते संजय राऊतांना  बाजूला करतात आणि पक्ष भूमिका राहते बाजूला, असं निलेश राणे म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी देखील शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली होती. शिवसेना हा एक कन्फ्यूज पक्ष आहे. त्यांना दुटप्पी भूमिका  घ्यायची सवय झालेली आहे, अशी टीका फडणीसांनी सोमवारी नागपुरात बोलताना केली होती. तर भाजपशी लढणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला?,  असा सवाल वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते? “शिवसेना हा एक कन्फ्यूज झालेला पक्ष आहे. त्यांच्या भूमिकांबद्दल आता आश्यर्च वाटत नाही. त्यांना दुटप्पी भूमिका घ्यायची सवय आहे. आमच्यासोबत असताना त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका बजावल्या. एकतर शिवसेनेने कधीच शेतीसंदर्भात भूमिका मांडली नाही. आतातरी शिवसेनेने राजकारण न करता शेतकऱ्यांबद्दल भूमिका घ्यावी”

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला?- प्रकाश आंबेडकर “शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस आता संपले असून आता त्यांना हमीभाव मिळणार नाही, अशावेळी शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने कृषी विधेयकाला पाठिंबा का दिला, याचा त्यांनी जाहीर खुलासा करावा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिलं होतं. (Nilesh Rane Criticized Shivsena Stand On Agriculture Bill)

संबंधित बातम्या-

शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष, सत्तेत असताना सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका : देवेंद्र फडणवीस

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.