राज्यातील नऊ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या दर्जात वाढ, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा मिळाला, पाहा कोणती कार्यालये
राज्यातील नऊ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा दिल्याने वाहनासंदर्भातील महत्वांच्या कामांसाठी बोरीवलीवासियांना आता अंधेरीला जायची गरज नाही. त्यांचे काम बोरीवलीत होईल.
मुंबई : राज्य सरकारने परिवहन आयुक्त ( Transport Commissioner ) कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी संवर्गातील नवीन पदांना मंजूरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील एकूण नऊ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या दर्जात वाढ करुन त्यांचे प्रादेशिक परिवहन कार्यालयात ( RTO ) रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे आता वाहन चालकांना ( Driver ) त्यांच्या वाहनांसंदर्भातील कामासाठी मुख्य आरटीओत जाण्याचा त्रास वाचणार आहे. कोणत्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर केले आहे ते पाहा..
ही आहेत नऊ आरटीओ कार्यालये
राज्यातील परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्या प्रस्तावानूसार 1) पिंपरी-चिंचवड, 2) जळगाव, 3) सोलापूर, 4 ) अहमदनगर, 5) वसई ( जि. पालघर ), 6) चंद्रपूर 7) अकोला, 8) बोरीवली ( मुंबई ), 9) सातारा येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या दर्जात वाढ करण्यात येऊन त्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात त्यांचे रुपांतर करण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे.
नागरिकांचा त्रास वाचणार
राज्यातील परिवहन कार्यालयाच्या आकृतीबंधास मंजूरी दिल्यामुळे आरटीओच्या पदांना मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील नऊ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा दिल्याने वाहनासंदर्भातील कामांसाठी आता उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याचा त्रास वाचणार आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी होणार ‘कार्यालय प्रमुख’
संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे ‘कार्यालय प्रमुख’ म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या उप प्रादेशिक आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या कार्यक्षेत्राचे अनुज्ञप्ती प्राधिकारी, नोंदणी प्राधिकारी व कराधान प्राधिकारी घोषित करण्याची कार्यवाही परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे करणार आहेत. सुधारीत आकृतीबंधानुसार पदांमध्ये झालेली वाढ किंवा घट यांच्या अनुषंगाने उपरोक्त दर्जावाढ केलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या बदली आणि प्रत्यावर्तन तसेच फेरवाटप याबाबत स्वतंत्र कार्यवाही करण्यात येईल.
हा तक्ता पाहा….