नितेश राणे कोल्हापुरातल्या रुग्णालयात दाखल, नितेश राणेंना झालंय काय?
आज नितेश राणेंना प्रकृतीच्या (Nitesh Rane Health) कारणास्तव रुग्णालयात दाखल केलं. गेलंय. मोठ्या पोलीस बंदोबस्ताना राणेंना घेऊन पोलिसांचा ताफा सिंधुदुर्गातून गगनबावड्यात पोहोचला. आणि गगनबावडा घाटातून पुढे कोल्हापुरातल्या रुग्णालयात दाखल झाला.
कोल्हापूर : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab Attack case) भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) सध्या अटकेत आहेत. न्यायालयाने त्यांना कोठडीत पाठवलं आहे. मात्र आज नितेश राणेंना प्रकृतीच्या (Nitesh Rane Health) कारणास्तव रुग्णालयात दाखल केलं. गेलंय. मोठ्या पोलीस बंदोबस्ताना राणेंना घेऊन पोलिसांचा ताफा सिंधुदुर्गातून गगनबावड्यात पोहोचला. आणि गगनबावडा घाटातून पुढे कोल्हापुरातल्या रुग्णालयात दाखल झाला. यावेळी कोल्हापुरातील रुग्णालय परिसरातही तगडा पोलीस बंदोबस्ता लावण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्यामागे कारवाईचा ससेमिरा लागला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला घडवून आणल्याचा नितेश राणे यांच्यावर आरोप आहे. आणि याच प्रकरणात न्यायालयाने चारवेळा जामीन फेटाळल्याने नितेश राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
नितेश राणेंना कुठे ठेवणार?
सुरुवातीला न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांकडून राणेंची आणखी दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी नाकारत नितेश राणेंना न्यायलयीन कोठडीत पाठवलं. नितेश राणेंना मानेचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली आहे. कोल्हापुरातील डॉक्टरांकडून राणेंच्या तपासणी होत असून, त्याच्या अहवालावरच राणेंना रुग्णालयात ठेवायचं को पुन्हा कोठडीत ठेवायचं याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.
रुग्णालयाला छावनीचे स्वरूप
कोकणातल्या राजकारण राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष कायमचा आहे. जेव्हापासून राणे शिवसेना सोडून गेले तेव्हापासून हा संघर्ष पेटला आहे. नितेश राणे यांच्यावरील कारवाई राजकीय सुडामुळे होत असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. तर पोलिसांच्या कारवाईत कोणताही हस्तक्षेप नाही, असे शिवसेना आणि महाविकास आघाडी नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. आमदार नितेश राणे यांच्या वैद्यकीय तपासणीच्या पार्श्वभूमीवर सीपीआर रुग्णालय परिसरालाही छावनीचे स्वरूप आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जामीनासाठी धडपड करूनही नितेश राणे यांना जामीन मिळालाच नाही. अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊनही त्यांच्या पदरी निराशा आली. आणि आता त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने भाजप आणि राणे कुटुंबियांची चिंता आणखी वाढली आहे.