Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो, तुम्ही…’, नितेश राणे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सांगलीत भाषण करताना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "या लोकांना काय वाटतं की, ह्यांच्या धमक्यांना भीक देणारे आम्ही लोकं आहोत. आम्ही सांगतो, चला या पोलिसांना सांगतो की, एक दिवसाची सुट्टी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा. हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानात उतरतो. आम्हालाही बघायचं आहे की, त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात की मुसलमान बघतात", असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.

'पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो, तुम्ही...', नितेश राणे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
आमदार नितेश राणेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 8:08 PM

भाजप आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्यापही सुरुच आहे. नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. “पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो. त्यांनी त्यांची ताकद दाखवावी, आम्ही आमची ताकद दाखवतो”, असं नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणे यांची आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चाची सभा पार पडली. यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. “या लोकांना काय वाटतं की, ह्यांच्या धमक्यांना भीक देणारे आम्ही लोकं आहोत. आम्ही सांगतो, चला या पोलिसांना सांगतो की, एक दिवसाची सुट्टी देतो. तुम्ही तुमची ताकद दाखवा. हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानात उतरतो. आम्हालाही बघायचं आहे की, त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात की मुसलमान बघतात. तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत नसेल तर एक दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या. त्या लोकांना साफ करण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल. पुढच्यावेळी एकही लव्ह जिहादची केस तुमच्यासमोर आली तर आधी त्याला शोधा, त्याच्या तंगड्या तोडा. मला फोन करा. काहीही होणार नाही ही माझी जबाबदारी”, असं नितेश राणे म्हणाले.

नितेश राणे यांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माध्यमांना विचारलं असता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं. “मी इथे आमदार किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही तर हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे. मी माझ्या धर्माचं काम करतोय. आज आमच्या धर्माला आव्हान दिलं जातंय. धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीत विटंबना केली जात आहे. दगड मारली जात आहेत म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका मांडतोय आणि माझ्या धर्मासाठी लढतोय”, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.

नितेश राणे काय-काय म्हणाले?

“आमच्या देवावर बोलला तर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही एका बापाचे आहात का? बाप विचारले तर एकमेकांकडे बघता. तुमचे आडनाव तरी एक आहे का? वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना थांबवले नाही तर आपले सण साजरे करू देणार नाहीत. मस्जिद असल्यावर पोलीस अधिकारी आम्हाला मार्ग बदलायला लावतात. मुस्लिम समाजला का रूट बदलायला लावत नाहीत? सावरकर म्हणतात, हिंदूंना हिंदूकडून भीती आहे. छत्रपती संभाजीराजेंच्या नावाने ब्रिगेड खोलली, संभाजीराजे समजून घ्या. जाणते राजे गणपती दर्शनाला गेले, पण ज्ञानेश महारावला सांगितलं नाही असे बोलू नको. मुस्लिमबाबत महाराव बोलले असते तर आज अंत्ययात्रा निघाली असती. त्यांचा आपण फक्त निषेध यात्रा काढत आहोत. अपशब्द वापरणाऱ्यांना सोडत असाल तर तुमचा काय उपयोग?”, असा घणाघात नितेश राणे यांनी केला.

“रामगिरी महाराज काय वेगळे बोलले? झाकीर नाईक याचे भाषण काढा. रामगिरी महाराज बोलले तेच बोलले. झाकीर नाईक बोलला तर चालतो, हिंदू विचाराच्या रामगिरी महाराजांनी बोललेले चालत नाही. त्यांना रामगिरी महाराज यांच्यावर आक्षेप नाही पण त्यांना संदेश द्यायचा आहे. त्यांना मारण्याच्या धमक्या देत आहेत. मुलांना स्टेटस ठेवले म्हणून मारले जाते. आम्ही काय बोललो तर धमक्या देतात. आम्ही धमक्यांना घाबरतो का? पोलिसांना एक दिवसाची सुट्टी देतो. तुम्ही या समोर. त्यानंतर दुसरी सकाळ हिंदु की मुस्लिम बघतो ते बघू. जिहाद्यांना आवरा नाहीतर शुक्रवार आमच्याकडे द्या”, असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.

“आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढू हा संदेश देण्याची गरज आहे. लव्ह जिहाद माध्यमातून बहिणींना फसवतात. आम्ही फक्त पोलिसांकडे जातो. पुढच्या वेळी लव्ह जिहाद केस आली तर पहिला त्याच्या तंगड्या तोडा आणि मला फोन करा. जिहाद्याच्या मनात भीती निर्माण करा. सहनशीलतेचा अंत असतो. महारावला माहीत आहे त्याला कोण काय करू शकत नाही. जाणते राजे म्हणून त्याला काही करत नाहीत. असे चालले तर हल्ले होतच राहतील”, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?
कबुतरांना दाणे टाकताय, मोह आवरा;नाहीतर पडणार महागात, BMCचा निर्णय काय?.