नितेश राणे पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार, हायकोर्टात जामीन मिळणार?
नितेश राणे पुन्हा हायकोर्टात (High Court) धाव घेणार आहेत. पहिल्यांदा नितेश राणेंचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला, त्यानंतर हायकोर्टानेही नितेश राणेंचा जामीन फेटाळला. त्यानंतर राणे सुप्रीम कोर्टात गेले. तिथेही त्यांची निराशा झाली. आणि आज पुन्हा सत्र न्यायलायत राणेंची चौथ्यांदा निराशा झाली.
सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष हल्ला (Santosh Parab Attack Case) प्रकरणात नितेश राणेंचा (Nitesh Rane) जामीन अर्ज चौथ्यांदा फेटाळल्यानंतर नितेश राणे पुन्हा हायकोर्टात (High Court) धाव घेणार आहेत. पहिल्यांदा नितेश राणेंचा जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला, त्यानंतर हायकोर्टानेही नितेश राणेंचा जामीन फेटाळला. त्यानंतर राणे सुप्रीम कोर्टात गेले. तिथेही त्यांची निराशा झाली. आणि आज पुन्हा सत्र न्यायलायत राणेंची चौथ्यांदा निराशा झाली. आता पुन्हा ते हायकोर्टात जाणार असल्याची माहिती राणेंच्या वकिलांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दहा दिवासांची मुदत दिल्यामुळे राणेंना दहा दिवस कोठडी नाही, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. अशी माहिती नितेश राणेंच्या वकिलांनी दिली आहे. तर पोलिसांनी राणेंना अडवल्यावरून त्यांना विचारले असता ही पोलिसांची दादागिरी आहे. पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत नितेश राणेंना अटक करायाची आहे, अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिली आहे. पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान केला आहे, ते आम्ही सुप्रीम कोर्टात मांडू असेही राणेंचे वकील म्हणाले आहेत.
सरकारी वकील काय म्हणाले?
नितेश राणेंचा जामीन अर्ज मेंटेनेबल नाही म्हणत कोर्टाने जामीन फेटाळल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. राणे यांनी आधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे शरण यावे आणि त्यानंतर जामीन अर्ज करावा असे मत कोर्टाने नोंदवले असल्याची देण्यात आली आहे. नितेश राणे हे आरोपी असून ते सुनावणीवेळी कोर्टात बसायचे, त्यांनी कोर्टात मी शरण यायला तयार आहे, असेही सांगितले. त्यावर कोर्टात बराच युक्तीवाद झाला, न्यायालयीन दाखले दिले गेले. त्यानंतर नितेश राणेंना एकतर जामीन घेऊन बाहेर जाऊ द्यायला हवे होते नायतर त्यांना, परवानगी घेऊन बाहेर जाऊ द्यायला हवं होतं मात्र आमच्या युक्तीवादाप्रमाणे कोणतीही ऑर्डर झाली नाही. त्यामुळे सरकारी वकिलांनी लेखी हुकूम करावा अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. यावर आम्ही सर्व वकील विचार विनिमय करून निर्णय घेऊ असे सूचक विधान सरकारी वकिलांनी केलं आहे.
कोर्टाची ऑर्डर येईपर्यंत सर्वांनी थांबणं गरजेचे होते, म्हणून पोलिसांनी नितेश राणेंना थाबवलं, त्यावर लेखी ऑर्डर होणे गरजेचे होते, मात्र नितेश राणे यांनी शरणागतीबाबत कोणताही लेखी अर्ज न दिल्याने कोर्टाने तशी ऑर्डर देण्यास नकार दिल्याचीही माहिती वकिलांनी दिली आहे. हा राणे यांना मागच्या दाराने जामीन दिल्याचा प्रकार होईल, असेही मत वकिलांनी नोंदवले आहेत. पोलीस सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आणि आजची ऑर्डर पडताळून पाहतील. त्यानंतर निर्णय घेतील, असेही ते म्हणाले आहेत.