किशोरी पेडणेकरांना नितेश राणेंचं तातडीने आव्हान, चला महिला आयोगाकडे, मी येतो बरोबर

महापौरांनी महिला आयोगाचे नाव काढून काही तासच झाले असतील तेवढ्यात नितेश राणेंनी पुन्हा ट्विट करत महापौरांना थेट आव्हान दिलंय. नितेश राणेंनी सोज्वळ शब्दात टोला लगावताना महापौर ताई, तुम्ही कधीही महिला आयोगाकडे चला मी बरोबर येतो असा जोरदार टोला लगवाला आहे.

किशोरी पेडणेकरांना नितेश राणेंचं तातडीने आव्हान, चला महिला आयोगाकडे, मी येतो बरोबर
नितेश राणे
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 3:39 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या (Narayan Rane) वादळी ट्विटमुळे सध्या दिशा सॅलियन (Disha Saliyan) हे नाव पुन्हा चर्चेत आलंय. दिशा सॅलियनवर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली असा आरोप राणेंकडून करण्यात येतोय. तर दिशाची बदनामी थांबवावी यासाठी महिला आयोगाने पुढाकार घ्यावा. असे आवाहन मुंईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी केले आहे. महापौरांनी महिला आयोगाचे नाव काढून काही तासच झाले असतील तेवढ्यात नितेश राणेंनी पुन्हा ट्विट करत महापौरांना थेट आव्हान दिलंय. नितेश राणेंनी सोज्वळ शब्दात टोला लगावताना महापौर ताई, तुम्ही कधीही महिला आयोगाकडे चला मी बरोबर येतो असा जोरदार टोला लगवाला आहे. भाजपची आघाडी बदनामी कडे वळतेय, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. तीन पैशांचा तमाशा किरीट सोमेयांच्या माध्यमातून मुंबईत होतोय. त्यांनी दिशा सलीयन बद्दल काढलेले उदगार व्यथित करणारे आहेत. तिच्या रिपोर्टला खोटं ठरवण्याचं काम ते करत आहेत, असा आरोप महापौरांनी केला आहे. त्यालाच आता राणेंनी ट्विट करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नितेश राणेंचे ट्विट काय?

नितेश राणे यांनी ट्विट करत, महापौर ताई…दिशा सालियनची मृत्यूनंतरही बदनामी, व्यथित झालेय…बरोबर…खरंच तीला न्याय मिळालाच पाहीजे…म्हणून तिच्या खऱ्या आरोपींना शिक्षा कशी होईल त्या साठी एक महिला म्हणून तुम्ही पुढे या…मी येतो महिला आयोगाकडे तुमच्या बरोबर..वेळ आणि तारीख कळवा! असे आव्हान महापौरांना दिले आहे. त्यामुळे हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे.भाजपच्या आरोपांमुळे दिशाच्या चारित्र्याचं हणन होत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विनंती आहे की यावर कारवाई करा. भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनाही सांगेन महिला म्हणून यात लक्ष घाला. मृत्यूनंतर ही बदनामी करणं महाराष्ट्राला शोभणार नाही, अशी घणाघाती टीका मुंबईच्या महापौरांनी केली आहे. तसेच दिशा सॅलियनबद्दल आणखी बोलताना, एका मुलीचा मृत्यू झालाय मात्र तिची बदनामी चालली आहे. तिच्या कुटुंबियांनी वारंवार सांगूनही हे महिलांच्या इज्जतीला किंमत देत नाहीत, असा घणाघात महापौरांनी केला आहे. त्याला आता ज्युनिअर राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

दिशा सॅलियनवरून राजकारणातली धग वाढली

नारायण राणे यांनी आरोप करताना, दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला? सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. केंद्रीय मंत्री राणे म्हणाले की, आमच्याकडेही काही माहिती आहे. 8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. सांगितले काय, तिनं आत्महत्या केली. तिला पार्टीला थांबायला सांगितलं. ती थांबली नाही. त्यानंतर कोण होतं. पोलीस प्रोटेक्शन कुणाला होतं. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचं होतं. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही. त्या इमारतीत राहायची त्यातील 8 जूनची पानं कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता, असा सवाल त्यांनी केला. हे आरोप सध्या राजकारणाची धग वाढवत आहेत.

किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा, तर दिशाची बदनामी थांबण्यासाठी महिला आयोगाने उतरावं-किशोरी पेडणेकर

MLA Chandrakant Patil| ‘आता मला नीलम ताईंबद्दल बोलावं लागेल’ ; आता पूर्वीची बीजेपी नाही,खूप स्ट्रॉग झाला – चंद्रकांत पाटील

लाव रे तो व्हिडिओः फडणवीस-सोमय्यांचा व्हिडिओ लावून विनायक राऊतांकडून राणेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.