मराठवाड्यातील ‘मिशन ऑक्सिजन’, उर्जामंत्र्यांकडून परभणीतील ऑक्सिजन प्लांटची पाहणी; अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश

नितीन राऊत यांनी आज परभणी दौर्‍यात ‘मिशन ऑक्सिजन’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटला भेट देत पाहणी केली.

मराठवाड्यातील 'मिशन ऑक्सिजन', उर्जामंत्र्यांकडून परभणीतील ऑक्सिजन प्लांटची पाहणी; अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश
Nitin Raut
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 7:58 PM

परभणी : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज परभणी दौर्‍यात शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या परिसरामध्ये ऊर्जा विभागाच्या वतीने ‘मिशन ऑक्सिजन’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटला भेट देत पाहणी केली. परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्रातील महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी परभणी जिल्हा परिषदेच्या परिसरात ऑक्सिजन प्रकल्प विक्रमी वेळेत स्थापन केल्याबद्दल आणि तेथून वैद्यकीय प्राणवायू निर्मिती सुरू केल्याबद्दल डॉ. राऊत यांनी महानिर्मितीच्या अधिकारी वर्गाचे विशेष अभिनंदन केले. (Nitin Raut inspects Oxygen Plant at Parbhani; Instructions for uninterrupted power supply)

ऑक्सिजन प्लांटला अखंडित वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले की, मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई व परभणी येथे ऊर्जा विभागाच्या वतीने ‘मिशन ऑक्सिजन’ अंतर्गत ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी मुकाबला करताना या दोन्ही प्लांटची आरोग्य यंत्रणेला मोठी मदत झाली आहे. 86 हजार लीटर प्रतितास क्षमता असलेला हा प्लांट अल्पावधीत उभा करून कार्यान्वित केल्याबद्दल ऊर्जा विभागाच्या व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही राऊत यांनी यावेळी केले.

यावेळी खासदार बंडू जाधव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, एमएसईबी सुत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महानिर्मितीच्या परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, अधीक्षक अभियंता श्याम राठोड, महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, अधीक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे, कार्यकारी अभियंता कैलास जमदाडे, प्रमोद क्षिरसागर तसेच काँग्रेसचे सिध्दार्थ हत्तीअंबिरे, नदीम इनामदार आदी उपस्थित होते.

ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी दौऱ्याची सुरवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत केली. याप्रसंगी परभणी जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या

आता लसीकरण केंद्रावर येण्याची गरज नाही?, घरोघरी होणार लसीकरण; लाभ कुणाला?, वाचा सविस्तर!

शेतकऱ्यांनी इतक्यात पेरणी करु नये, अतिवृष्टीमुळे बियाणं वाया जाईल; कृषी विभागाचा सल्ला

(Nitin Raut inspects Oxygen Plant at Parbhani; Instructions for uninterrupted power supply)

पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.