maratha reservation | मनोज जरांगे पाटील यांचा लाँगमार्च नवी मुंबईच्या वेशीवर… ओबीसी महासंघाच्या नेत्याचा इशारा काय ?

मनोज जरांगे यांच्या दबाव तंत्राला उत्तर म्हणून आता ओबीसी समाजाने देखील मुंबई कडे कूच करण्याची पूर्व तयारी सुरु केली आहे. मनोज जरांगे यांच्या दबाव तंत्राला ओबीसी समाज उत्तर देणार असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे

maratha reservation | मनोज जरांगे पाटील यांचा लाँगमार्च नवी मुंबईच्या वेशीवर... ओबीसी महासंघाच्या नेत्याचा इशारा काय ?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Jan 25, 2024 | 11:25 AM

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 25 जानेवारी 2024 : मनोज जरांगे यांच्या दबाव तंत्राला ओबीसी समाज उत्तर देणार असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे. ओबीसी समाजाने देखील मुंबईकडे कूच करण्याची पूर्व तयारी सुरु केली आहे असा इशारा डॉ. तायवाडे यांनी दिला आहे. जरांगे यांच्या दबावाला सरकार बळी पडलं तर ओबीसी समाज पेटून उठेल, असंही त्यांनी म्हटलंय.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मुंबईकडे हळूहळू कूच करत आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पुणे जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ते लोणावळ्यात दाखल झाले आहेत. हळूहळू ते नवी मुंबईच्या दिशेन येत असून उद्या जरांगे पाटील आणि आंदोलक मुंबईत दाखल होतील. मराठा आरक्षणासाठी उद्यापासून त्यांचे मुंबईत आंदोलन सुरू होणार आहे.

काय म्हणाले डॅा. बबनराव तायवाडे ?

मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे. यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यांचा (मराठा आंदोलक) सरकारवर कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न झाला तरी सरकारने ओबीसी समाजाला आणि ओबीसी संघटनांना जो शब्द दिलेला आहे. आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहोत परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावात, ओबीसीमधून आरक्षण देणार नाही, सरकारने ही भूमिका स्पष्ट केलेली होती. सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही, असंही सरकारने म्हटलं होतं.

आम्हाला दिलेला शब्द सरकार फिरवण्याच्या मानसिकतेत असेल आणि ओबीसीतून मराठा समाजाला हिस्सा देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आमच्या ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी या राज्यातील, प्रत्येक गावा-खेड्यातील ओबीसी हा रस्त्यावर उतरेल आणि मुंबईच्या दिशेन कूच करेल, असा इशारा डॉ. तायवाडे यांनी दिला.

जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारला सादर करून , सरकार पुन्हा त्यावर विचार करेल आणि त्यानंतर जो निर्णय होईल आणि तो अहवाल विशेष अधिवेशनात ठेवत नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण शक्य नाही, असं ते म्हणाले.

जरांगे यांनी सरकारवर दबाव तयार करण्यापेक्षा सरकार काय करू शकते व काय करू शकत नाही यांचा विचार करून सरकारला वेळ द्यायला पाहिजे, असंही डॉ. तायवाडे यांनी नमूद केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.