AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Obc reservation : अजित पवार, विजय वडेट्टीवारांनी माफी मागून राजीनामा द्यावा-प्रकाश शेंडगे

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माफी मागून राजिनामा द्यावा, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. राज्य सरकारला राजकीय शिक्षण नाही, जर आमच्या आरक्षाशिवाय निवडणुका घेतल्या तर रसत्यावर ऊतरू असा इशारा त्यांनी दिला आहे.

Obc reservation : अजित पवार, विजय वडेट्टीवारांनी माफी मागून राजीनामा द्यावा-प्रकाश शेंडगे
prakash shendge
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 4:54 PM

ओसीबी समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश स्थगित करून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्यात, असे आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर राज्यातले ओबीसी नेते आता चांगलेत आक्रमक झालेत. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी निवडणुका घेतल्या तर रस्त्यावर उतरून जाब विचारू असा कडकडीत इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्यामुळे वातावरण पुन्हा तापले आहे.

अजित पवार, वडेट्टीवार यांनी माफी मागून राजिनामा द्यावा

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माफी मागून राजिनामा द्यावा, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. राज्य सरकारला राजकीय शिक्षण नाही, जर आमच्या आरक्षाशिवाय निवडणुका घेतल्या तर रसत्यावर ऊतरू असा इशारा त्यांनी दिला आहे. अजित पवारांनी पाच कोटी देऊन वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या, सारथीला 1 हजार कोटी देता आणि आम्हाला पाच कोटी? असा सवालही प्रकाश शेंडगे यांनी विचारला आहे.

नाव न घेता शरद पवारांवर टीका

राज्य सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाही. आता रोहतगी दिसू लागले, सरकरचा रिमोट ज्यांच्या हातात त्यांची आरक्षण देण्याची इच्छा नाहीये, इथे झारीचे अनेक शुक्राचार्य आहेत अशी टीका शरद पवारांवर नाव न घेता प्रकार शेंडगे यांनी केली आहे.

आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास रस्त्यावर उतरू

निवडणूक आयोगच आता 21 तारखेची निवडणूक पुढे ढकलू शकते. राज्य सरकारला एफिडेव्हीट द्यावं लागेल. ओमिक्रॉन आणि कोरोनाचे कारण देतही या निवडणुका पुढे ढकलू शकता, असेही शेंडगे म्हणाले आहेत. आत्ता भूजबळ म्हणतात की युद्धपातळीवर डाटा गोळा करा, केंद्राकडे बोट दाखवता, ही तुमचीही जबाबदारी आहे, असे म्हणत त्यांनी भुजबळांवरही निशाना साधला आहे. राज्याच्या प्रधान सचिवांनी आयोगाला निर्देश दिले की सॅम्पल गोळा करा, या अधिकाऱ्यांना हे अधिकार कुणी दिले? निर्देश बदलावे लागणार अन्यथा डाटा गोळा करता येणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.

Pimpri -Chinchwad Crime| 11 महिन्यात145 बलात्कार तर 333 विनयभंगाच्या तक्रारी; ओळखीच्या लोकांकडून होतोय अत्याचार

Foot Pain | तुमचेही पाय दुखतात? जाणून घ्या कारणं आणि घरगुती उपाय

Cidco Lottery | 2022 | घर घेण्याचं स्वप्न होणार साकार, सिडको स्वस्तात घर विकणार?

बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!
बुध-सूर्य संक्रमण होणार; येणारे १६ दिवस संकटांनी भरलेले असतील!.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....