Omicron Variant : चिंता वाढली, राज्यात ओमिक्रॉनचे 50 नवे रुग्ण, एकट्या पुण्यात 36 रुग्णांची नोंद

मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. पुण्यात आज दिवसभरात 524 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर आज पुण्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची (Omicron Variant) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Omicron Variant : चिंता वाढली, राज्यात ओमिक्रॉनचे 50 नवे रुग्ण, एकट्या पुण्यात 36 रुग्णांची नोंद
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 8:26 PM

पुणे : राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव (Corona Outbreak) आता चिंताजनक ठरू लागला आहे. कारण आज एका दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजाराने वाढला आहे. तर एकट्या मुंबईत 8 हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. पुण्यात आज दिवसभरात 524 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर आज पुण्यात ओमिक्रॉन व्हेरियंटची (Omicron Variant) लागण झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

संसर्गाचा वेग जास्त असलेल्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले 50 नवे रुग्ण आज राज्यात सापडले आहेत. त्यातील 36 रुग्णांची नोंद एकट्या पुण्यात झाली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये 8 रुग्ण सापडले आहेत. राज्यात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 510 झाली आहे. त्यापैकी 193 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एका रुग्णाचा पिंपरी-चिंचवडच्या वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील कोरोनाची स्थिती

>> दिवसभरात 524 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. >> दिवसभरात रुग्णांना 79 डिस्चार्ज. >> पुणे शहरातील 1 तर पुण्याबाहेर 1 अशा दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू >> 99 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू >> पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 5 लाख 11 हजार 141 >> पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2 हजार 514 >> एकूण मृत्यू – 9 हजार 118 >> आजपर्यंत एकूण डिस्चार्ज- 4 लाख 99 हजार 509

लसीकरणावर राज्य सरकारचा भर

रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्य सरकारकडून नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे. राजधानी मुंबईच्या प्रशासनाकडूनदेखील खरबदारी म्हणून वेगवेगळ्या उपायोजना केल्या जात आहे. तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई मनपाने आगावीची तयारी केली आहे. शहरातील बीकेसी येथे जंबो व्हॅक्सिनेशन सेंटर उभारण्यात आले असून येथे 15-18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष लसीकरणाला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी शनिवारपासूनच लसीकरण नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात करण्यात आलीय. 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे आधारकारर्ड तसेच आधारकार्ड नसेल तर शाळेतील ओळखपत्राच्या मदतीने मुलांचे लसीसाठी नाव नोंदवता येते.

सोमवारी महापौर आणि अधिकाऱ्यांची बैठक

पुणे माहापालिका अलर्ट झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी, 3 जानेवारी रोजी महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणि अन्य महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापौरांनी बोलावलेल्या बैठकीत पुणे शहरात कोरोना निर्बंधांमध्ये वाढ करावी का? तसंच शाळा पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने कराव्यात का? याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. दुसरीकडे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची तयारीही करण्यात आली आहे. पुणे शहरात 40 ठिकाणी लसीकरण होणार आहे. त्यासाठी जवळपास अडीच लाख पात्र विद्यार्थ्यांचं लसीकरण होणार असल्याची माहिती मिळतेय.

इतर बातम्या : 

Video : भाजप आमदाराकडून अजितदादांचं तोंडभरुन कौतुक, मग दत्तामामांची थेट ऑफर!

Maharashtra Corona update : राज्यातला आजचा कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजारांच्या जवळ, 11 हजार 877 नवे रुग्ण

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....