Omicron : ओमिक्रॉनचा धोका; महाराष्ट्र सरकारकडून नवी नियमावली जारी, कुठले नियम पाळावे लागणार?
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जारी केली आहे. दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही देशांमध्ये कोविड-19 चा नवीन विषाणू ओमिक्रोन सापडल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच त्या विषाणूंना “चिंतेची बाब” (Variant of concern) म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घोषित केल्याने महाराष्ट्र शासनाने हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहे.
मुंबई : भारतात कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉन (Omicron) धोका वाढला आहे. कारण, महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यात 2 जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Central Health Ministry) काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जारी केली आहे. दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही देशांमध्ये कोविड-19 चा नवीन विषाणू ओमिक्रोन सापडल्याच्या पार्श्वभूमीवर तसंच त्या विषाणूंना “चिंतेची बाब” (Variant of concern) म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घोषित केल्याने महाराष्ट्र शासनाने हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहे.
Guidelines for Air Passengers coming into Maharashtra pic.twitter.com/cvBGa2jjIa
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 2, 2021
तत्काळ प्रभावाने नवीन निर्देश जारी
ओमिक्रोन विषाणूवर महाराष्ट्रात निर्बंध घालण्यासाठी 30 नोव्हेंबर 2021 रोजी निर्गमित केलेल्या आदेशाला अधिग्रहित करून तत्काळ प्रभावाने नवीन निर्देश निर्गमित करण्यात आले आहे.
1. भारत सरकारने वेळोवेळी लादलेले निर्बंध व निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्त्वे हे न्यूनतम निर्बंध म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय आणि घरगुती हवाई प्रवाशांसाठी लागू असतील.
2. तीन राष्ट्रांना “हाय रिस्क” अर्थात अधिक जोखीम असलेले राष्ट्रांच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यात दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि झिंबाब्वे यांचा समावेश आहे.
3. उच्च जोखीम असलेले राष्ट्रांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय हा ओमिक्रोन विषाणू आढळल्यानंतर सध्या परिस्थितीच्या आधारे घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाला आवश्यकतेनुसार त्याचे अद्यतन करता येईल.
4. खालील वर्गात मोडणाऱ्या हवाई प्रवाशांना उच्च जोखीम असलेले हवाई प्रवासी म्हणून घोषित करण्यात येईल. त्यात अधिक धोका असलेल्या राष्ट्रांमधून महाराष्ट्रात दाखल होणारे सर्व हवाई यात्रेकरू. असे हवाई प्रवाशी की ज्यांनी महाराष्ट्रात दाखल होण्याच्या अगोदर 15 दिवसात उच्च जोखीम असलेल्या राष्ट्रांना भेट दिलेली आहे.
Until today morning, 861 international passengers have been tested with RT-PCR and 3 of them have been found positive. Samples of all three have been sent for genomic sequencing: Public Health Department, Government of Maharashtra #COVID19 pic.twitter.com/3YBd5D1Gn1
— ANI (@ANI) December 2, 2021
उच्च धोका असलेल्या हवाई यात्रेकरूंसाठी निर्बंध
5. भारत सरकारने पूर्वीच लादलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त केवळ उच्च धोका असलेल्या हवाई यात्रेकरूंसाठी खालील निर्बंध ही लागू असतील,
“उच्च जोखीम असलेले हवाई प्रवाशांना प्राधान्यक्रमाने स्वतंत्र काउंटरवर उतरण्यासाठी वेगळी व्यवस्था तेथील विमानतळ व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत केली जाऊ शकेल, जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या तपासण्या आणि विविध चाचण्या करणे सोपे व्हावे. अशा सर्व हाय रिस्क हवाई प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्या उतरल्या तात्काळ RTPCR चाचण्या कराव्या लागतील आणि सात दिवस सक्तीच्या संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. त्यांची दुसरी RTPCR चाचणी सात दिवसाच्या कालखंडानंतर करण्यात येईल. या चाचणीत जर कोणीही पॉझिटिव्ह आढळलयास अश्या हाय रिस्क प्रवाशांना कोविड उपचाराच्या सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात येईल आणि जर सातव्या दिवशी घेतलेल्या RTPCR चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास अशा उच्च जोखीम असणाऱ्या हवाई यात्रेकरूंना सात दिवसांसाठी गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल.”
#Omicron | Govt of Maharashtra revises its guidelines for passengers arriving in the state
In the case of domestic air travel, Passengers will either have to be fully vaccinated or compulsorily carry RT-PCR Test certificate showing negative result within 72 hours before boarding pic.twitter.com/svHb56CHe8
— ANI (@ANI) December 2, 2021
परदेशातून आलेल्या प्रवाशांना 15 दिवसांची माहिती द्यावी लागणार
6. उपयुक्त (इमिग्रेशन) तसेच FRRO यांना असे निर्देश देण्यात आले आहे की, विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाद्वारे येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांनी मागील पंधरा दिवसात ज्या- ज्या देशांना भेटी दिलेल्या आहे, त्यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करावे. त्याच प्रमाणे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एम आय ए एल) ला ही असे निर्देशित करण्यात आले आहे की, त्यांनी मागील पंधरा दिवसात हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती सर्व एयरलाईन्सकडे ही द्यावी. जेणेकरून या प्रवाशांच्या यात्रेसंबंधी माहितीची पडताळणी करणे सोपे होईल. प्रवाशांनी जर चुकीची माहिती दिल्याचे आढळलयास आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005 च्या विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल.
देशांतर्गत हवाई प्रवासासाठी लसीकरण अनिवार्य
7. देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्या सर्व यात्रेकरूंना पूर्णपणे लसीकरण केले असणे आवश्यक आहे. असे नसेल तर त्यांच्याजवळ आगमनाच्या 72 तासा अगोदरचे RTPCR ‘निगेटिव’ अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
इतर बातम्या :