महावितरणला केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दिली दीड एकर जमीन, हजारोंच्या घरात प्रकाश

जमिनीला सोन्याचा भाव असताना महावितरणच्या नाशिक (Nashik) परिमंडलातील खिरविरे (ता. अकोले) येथील महावितरणच्या (MSEDCL) प्रस्तावित विद्युत उपकेंद्रासाठी (sub-center) नाममात्र केवळ एक रुपयाचा मोबदला घेऊन मोहन राठोड यांनी परिसरातील हजारो घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांचे जीवनमान प्रकाशमय करण्याची सामाजिक बांधिलकी जपली आहे.

महावितरणला केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दिली दीड एकर जमीन, हजारोंच्या घरात प्रकाश
मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना मोहन राठोड यांनी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संमतीपत्र दिले.
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 2:55 PM

मनोज कुलकर्णी, नाशिकः जमिनीला सोन्याचा भाव असताना महावितरणच्या नाशिक (Nashik) परिमंडलातील खिरविरे (ता. अकोले) येथील महावितरणच्या (MSEDCL) प्रस्तावित विद्युत उपकेंद्रासाठी (sub-center) नाममात्र केवळ एक रुपयाचा मोबदला घेऊन मोहन राठोड यांनी परिसरातील हजारो घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांचे जीवनमान प्रकाशमय करण्याची सामाजिक बांधिलकी जपली आहे. या उपकेंद्रामुळे अकोले तालुक्यातील अनेक गावांमध्ये हजारो नवीन वीजजोडण्यांसह सुरळीत व योग्य दाबाने वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. (One and a half acre land for MSEDCL sub-center with only one rupee, Light in the house of thousands)

याबाबत माहिती अशी की, अहमदनगर मंडळातील संगमनेर विभागाच्या अकोले उपविभाग अंतर्गत उच्च दाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) टप्पा दोनमधून खिरविरे येथे ३३/११ केव्ही उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. या उपकेंद्रामुळे परिसरातील अनेक गावांमधील प्रामुख्याने घरगुती व इतर वर्गवारीच्या ग्राहकांसह शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या वीजजोडण्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. सोबतच अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा उपलब्ध होईल. मात्र, या उपकेंद्रासाठी प्रयत्न करूनही महावितरणला योग्य ठिकाणी जमीन मिळण्यास अडचण निर्माण झाली होती. परिणामी उपकेंद्राच्या उभारणीसाठी विलंब होत होता.

खिरविरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व प्रशासक गणपत डगळे व ग्रामस्थांना महावितरणकडून ही जागेची अडचण सांगण्यात आली. त्यांनी याच परिसरातील जमीनमालक व कल्याण येथील व्यावसायिक मोहन राठोड यांच्याशी संपर्क साधून जमिनीची उपकेंद्रासाठी निकड असल्याचे सांगितले. राठोड यांनी या उपकेंद्राची संपूर्ण माहिती व होणाऱ्या लाभांची माहिती घेतली आणि नाममात्र केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दीड एकर स्वमालकीची जमीन उपकेंद्रासाठी देण्याचा निर्णय घेतला. यानंतर ही जमीन उपकेंद्रासाठी हस्तांतरणाची प्राथमिक प्रक्रिया नाशिक येथे नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. महावितरणचे नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी श्री. मोहन राठोड यांचा विद्युत भवन,नाशिक येथे नुकताच कृतज्ञतापूर्वक गौरव केला व आभार मानले. स्थापत्य विभागाचे नाशिक विभागाचे कार्यकारी अभियंता नीलेश चालिकवार व अहमदनगर उपविभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता बबिता खोब्रागडे यांनी जमीन हस्तांतरणाच्या कामात सहकार्य केले.

जमीन उपलब्ध होण्यात अडचणी

महावितरणकडून सद्यस्थितीत तत्पर व अखंडीत ग्राहकसेवेसाठी विविध योजनांमधून वीजयंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरण करण्यात येत आहे. मात्र, यासाठी योग्य मोबदला देऊन सुद्धा जमीन उपलब्ध होण्यात अडचणी येतात. परिणामी वीज यंत्रणा उभारणीच्या कामांना देखील विलंब होतो. मात्र, मोहन राठोड यांनी गावाचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपत उपकेंद्रासाठी नाममात्र एक रुपयाच्या मोबदल्यात दीड एकर म्हणजे सुमारे सहा हजार चौरस मीटर जमीन उपलब्ध करून दिल्याने उपकेंद्र उभारणीला वेग मिळाला आहे. त्यामुळे गावासह परिसरातील हजारो नागरिकांचे जीवनमान प्रकाशमय होणार आहे. (One and a half acre land for MSEDCL sub-center with only one rupee, Light in the house of thousands)

इतर बातम्याः 

ओ मेरे सोना रे सोना रे सोना…नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने 46900 वर!

नाशिकमध्ये डेंग्यू, चिकुन गुन्याचे थैमान; रुग्णांची संख्या तेराशेंच्या घरात

Non Stop LIVE Update
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.