लाखात एक, कारपेक्षाही महाग घोडा; या घोड्याच्या खुराकाची घेतली जाते अशी काळजी

प्रत्येक घोड्याची किंमत ही 5 ते 6 लाखांच्या घरात आहे. एखाद्या पैलवानाप्रमाणे त्याच्या खुराकाची काळजी घेतली जाते. त्यांच्या आहारात दररोज दूध, तूप, गहू, चना आदी खाद्यांचा समावेश आहे.

लाखात एक, कारपेक्षाही महाग घोडा; या घोड्याच्या खुराकाची घेतली जाते अशी काळजी
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 4:04 PM

सांगली : लाखात एक घोडा अन् तोही कारपेक्षाही जास्त किमतीचा घोडा. या घोड्याला पैलावानाप्रमाणे खुराकाची काळजी घेतली जाते. छंद जोपासणे ही गोष्ट सोपी दिसत असली तरी त्यासाठी खूप मेहनत ही घ्यावी लागते. सांगलीतील मुजावर बंधूंनाही घोडे पााळण्याचा अनोखा छंद आहे. सांगलीतील बेताब फर्मचे मालक मुजावर बंधू त्यांच्या घोड्यांवरील प्रेमासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. दिवगंत शौकत मुजावर यांनी सर्वप्रथम घोडे पालनाचा छंद सुरू केला. त्यानंतर त्यांची मुले सलीम शौकत मुजावर आणि जावेद शौकत मुजावर यांनी ही परंपरा जोपासली आहे. मुजावर बंधूंकडे सर्वात प्रतिष्ठित मानली जाणारी मारवाडी, सिंध काटेवडी आणि पंजाबी या जातीचे घोडे त्यांच्याकडे आहे. या घोड्यांची किंमत ऐकली तर तूमचे डोळे पांढरे होतील.

दूध, तूप, चना आदी खाद्यांचा समावेश

प्रत्येक घोड्याची किंमत ही 5 ते 6 लाखांच्या घरात आहे. एखाद्या पैलवानाप्रमाणे त्याच्या खुराकाची काळजी घेतली जाते. त्यांच्या आहारात दररोज दूध, तूप, गहू, चना आदी खाद्यांचा समावेश आहे. त्याचा सांभाळ देखील खूप महत्त्वाचा आहे. घोड्यांची स्वच्छता तसेच दररोज मालिश करून त्याची निगा राखली जाते. या घोड्यांना प्रदर्शन तसंच लग्न समारंभात मोठी मागणी असते. लग्नाच्या वरातीत घोड्यावर स्वार होऊन येण्याचा नवरदेवाचा मान असतो त्यामुळे हजारो रुपयांचे भाडे घेतले जाते. मध्यंतरी कोरोनाच्या काळात घोड्यांच्या व्यवसायावर मोठे संकट आले होते.

हजारो रुपयांची खुराक

लग्न समारंभाला असलेली बंधने, वरातीला बंदी यामुळे घोडा व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. वेळप्रसंगी पदरमोड करून हजारो रुपयांचा खुराक या घोड्यांना द्यावा लागत होता. आता दोन वर्षानी निर्बंध हटल्यानंतर आता हा व्यवसाय पूर्वपदावर आला आहे. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात घोडे सांभाळण्याचा छंद मोठ्या प्रमाणात केला जातो. पण हा छंद सोपा नाही. त्यासाठी मोठ्या कष्टाची गरज आहे. त्याच पद्धतीने मुजावर बंधू घोडे सांभाळत आहेत. असं जावेद मुजावर आणि सलीम मुजावर यांनी सांगितलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.