Cannes :कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडलेल्या ‘पोटरा’चित्रपटातील छकुली देवकरला एक लाखांची मदत

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावची रहिवाशी असलेल्या कु. छकुलीच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आणि हलाखीची आहे. तिच्या कुटुंबियांना राहण्यास स्वतःचे घर नसून गावातील एका फाटक्या झोपडीत छकुली आई-वडिलांसह वास्तव्यास आहे.

Cannes :कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडलेल्या ‘पोटरा’चित्रपटातील छकुली देवकरला एक लाखांची मदत
बालकलाकार छकुली देवकरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 11:17 PM

मुंबई : यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes International Film Festival) निवड झालेल्या ‘पोटरा’या चित्रपटातील बालकलाकार कु. छकुली देवकर हिच्या घरच्या बिकट आणि हलाखीच्या परिस्थितीची माहिती कळताच तिला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला होता. त्यानुसार छकुलीला तात्काळ एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार असल्याची घोषणा चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी आज केली. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याच्या हेतूने दरवर्षी राज्य शासनाकडून तीन मराठी चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फ्रान्स येथे पाठविले जातात. यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘पोटरा’(‘Potra’ Film),‘कारखानीसांची वारी’आणि ‘तिचं शहर होणं’या मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. ‘पोटरा’या चित्रपटातील बालकलाकार कु. छकुली प्रल्हाद देवकर (वय 15 वर्षे) (Child Artist Chhakuli Deokar) हिचा ‘पोटरा’हा पहिला चित्रपट असून यापूर्वी तिने कोणत्याही चित्रपट अथवा नाटकात भूमिका केलेली नाही. तिला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-2022 मध्ये उत्कृष्ट कलाकार म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे.

राहण्यासही स्वतःचे घर नाही

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावची रहिवाशी असलेल्या कु. छकुलीच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आणि हलाखीची आहे. तिच्या कुटुंबियांना राहण्यास स्वतःचे घर नसून गावातील एका फाटक्या झोपडीत छकुली आई-वडिलांसह वास्तव्यास आहे. तिचे वडील आजारी असून ते अंथरुणावर पडून असतात आणि आई मोलमजुरी करते, ही माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना कळताच त्यांनी छकुलीला आर्थिक मदत देऊन तिच्यातील कलागुणांना विकसित करण्यासाठी पुढील शिक्षणाचे नियोजन करण्याचे निर्देश चित्रनगरी प्रशासनाला दिले होते. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चित्रनगरी प्रशासनाने तात्काळ पावले उचलत छकुलीला एक लाख रुपयांचा धनादेश आणि अभिनय क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी तिच्या कुटुंबियांच्या सल्ल्याने महामंडळाच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमनवार यांनी आज जाहीर केले.

हे सुद्धा वाचा

17 ते 28 मे दरम्यान कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

येत्या 17 ते 28 मे दरम्यान होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी, ‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मुंबईत ही माहिती दिली होती. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणं, तसंच देशातल्या चित्रिकरण आणि पर्यटन स्थळांचं महत्व वाढवणं या हेतुनं राज्य शासन मराठी चित्रपटांचं प्रदर्शन कान्स आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवात करतं. या महोत्सवासाठी निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होतात. यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवासाठी शासनाकडून पाठवायच्या 3 मराठी चित्रपटांची निवड करण्यासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत 7 तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....