‘अरे निर्लज्जांनो लाज वाटली पाहिजे,’ सावरकरांच्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा शिवसेनेवर हल्ला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आता स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्याबद्दल बोलताना शिवसेनेवर टीकेचे असूड ओढले आहेत. शिवसेना सावरकरांची कसली वारसदार त्यांना लाज वाटली पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

'अरे निर्लज्जांनो लाज वाटली पाहिजे,' सावरकरांच्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा शिवसेनेवर हल्ला
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 5:16 PM

नाशिक : शिवसेना सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मोठं रान उठवलेलं आहे. शिवसेनेने हिंदुत्त्व सोडलं असं भाजप नेते सतत म्हणत असतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आता स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्याबद्दल बोलताना शिवसेनेवर टीकेचे असूड ओढले आहेत. शिवसेना सावरकरांची कसली वारसदार त्यांना लाज वाटली पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

सावरकरांची कसली वारसदार त्यांना लाज वाटली पाहिजे

दोन दिवसांपूर्वी संसदेत खासदारांचे निलंबन झाले तेव्हा माफ़ी मागायला आम्ही सावरकर आहोत का असे शिवसेना सदस्य म्हणतात, हा निर्लज्जपणा आहे. शिवसेना सावरकरांची कसली वारसदार त्यांना लाज वाटली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी

तसेच ज्येष्ट गीतकार जावेद अख्तर यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाबद्दलदेखील फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी धरला जातो. नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषविले आहे. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव आहेत.  या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच आहे. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर

तसेच पुढे बोलताना आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला शुभेच्छा आहेतच. पण जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल,  तर तेथे जाऊन तरी काय करायचे? अशी भावान फडणवीस यांनी व्यक्त केली.

जावेद अख्तर नैराश्यात बोलत आहेत

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात केलेल्या भाषणानंतर त्यांच्यावरदेखील टीका केली. यांच्यासारखे लोक एकांगी कोणाच्या तरी प्रेरणेतून बोलतात. अशा लोकांनी पुरस्कार परत करून बघितले, टीका केली. पण लोक मोदींच्या मागे आहेत. त्यामुळे ते नैराश्या्ता बोलत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या :

Nashik: ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते बाल साहित्य मेळाव्याचे उद्घाटन, बोक्या सातबंडे फेम अभिनेत्यासोबत मुलांनी मारल्या गप्पा

Jawed Akhtar Speech | जे युरोपात नव्हतं, देशातही नव्हतं ते महाराष्ट्रात, जावेद अख्तरांनी मराठी जनांना ‘गर्वा’चं घर दाखवलं…!

Nashik| इतकीच शर्त आहे, मी वाकणार नाही…पांढरपट्टे यांच्या गझल सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.