यंदा पाऊस कमी झाल्यामुळे दिवाळीत पाणीप्रश्न पेटणार? दोन जिल्ह्यांत पाण्यावरुन वाद

ahmednagar news : राज्यात यंदा मॉन्सूनने सरासरी न गाठता निरोप घेतला. कमी मॉन्सून झाल्याचा फटका आतापासून दिसू लागला आहे. राज्यातील धरणांमध्ये जलसाठा अपूर्ण आहे. यामुळे पाण्यावरुन दोन जिल्ह्यांत वाद सुरु झाला आहे. अहमदरनगर आणि छत्रपती संभीजनगर या दोन जिल्ह्यात पाणी सोडण्याचा वाद होत आहे.

यंदा पाऊस कमी झाल्यामुळे दिवाळीत पाणीप्रश्न पेटणार? दोन जिल्ह्यांत पाण्यावरुन वाद
jayakwadi damImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 8:52 AM

कुणाल जयकर, शिर्डी, अहमदनगर | 8 नोव्हेंबर 2023 : यंदा पावसाने सरासरी गाठली नाही. राज्यातील अनेक प्रकल्प भरले नाही. यामुळे पुढील वर्षी जुलै महिन्यांपर्यंत पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. धरणातील पाण्यासाठी पहिले आरक्षण पिण्यासाठी पाण्याचे आहे. त्यानंतर शेतीसाठी पाणी देण्यात येणार आहे. यंदा खरीप हंगाम समाधानकारक झाला नाही. यामुळे रब्बी हंगामासाठी धरणातून पाणी मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. परंतु राज्यातील दोन जिल्ह्यात पाण्यावरुन वाद सुरु झाला आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील पाणी छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी प्रकल्पात सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. यामुळे ऐन दिवाळीच्या सणासुदीत पाणीप्रश्न पेटणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास राजकीय नेत्यांसह शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत नगर आणि नाशिकमधील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्याचा आदेश देण्यात आलाय. जवळपास साडेआठ टिएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. परंतु या निर्णयास नाशिक आणि नगर जिल्ह्यातून विरोध होत आहे. जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडले तर नगर नाशिकमधील शेतकरी संकटात सापडणार असल्याचे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी म्हटले आहे.

खासदार लोखंडे यांनी घेतली बैठक

अहमदनगरमधील निळवंडे धरणातून दुष्काळग्रस्त भागात सोडलेले पाणी अद्याप अनेक गावात पोहचलेच नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकरी संतप्त झालेले आहे. त्याचवेळी जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जायकवाडीला पाणी सोडणार असल्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत बैठक घेतली. या बैठकीत नगरमधील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

तो कायदा अन्यायकारक

समन्यायी पाणी वाटप कायदा 2005 साली झालेला आहे. हा कायदा म्हणजे काळा कायदा आहे. नगर नाशिकवर यामुळे अन्याय होत आहे. दोन्ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून यासाठी लढा देण्याची गरज असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.