AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी ‘या’ दिवशी विशेष मोहीम; नाशिक जिल्ह्यात शिबिर अन् ग्रामसभेचे आयोजन

मतदार यादीमधील नाव नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणे तसेच नवीन नोंदणी आदी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहचण्यासाठी मंगळवारी, 16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी 'या' दिवशी विशेष मोहीम; नाशिक जिल्ह्यात शिबिर अन् ग्रामसभेचे आयोजन
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 5:12 PM

नाशिकः जिल्ह्यातील समस्त नवमतदारांसाठी एक आनंदाची बातमी. ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही, त्यांच्यासाठी मतदार नावनोंदणी आणि मतदार नाव दुरुस्तीसाठी विशेष शिबिर आणि ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास पावणेतीन लाख दुबार मतदान आढळल्याची तक्रार शिवसेनेने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्धीकरणाची मोहीम राबण्यात येत आहे. शिवाय जिल्ह्यात येत्या फेब्रुवारी महिन्यात नाशिक आणि महापालिका निवडणूक होत आहे. सध्याही बाजार समित्यांची निवडणूक लागलेली आहे. या साऱ्या घडामोडी लक्षात घेता मतदार नावनोंदणी आणि दुरुस्तीसाठी विशेष मोहीम राबण्यात येत आहे.

या तारखांना मोहीम जिल्ह्यात 27, 28 नोव्हेंबर रोजी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमध्ये मतदार यादीतील नावामध्ये दुरुस्ती, नाव वगळणे तसेच नवीन नोंदणी आदी प्रक्रिया होईल. सोबत जिल्ह्यातील गावांमध्ये मंगळवारी, 16 नोव्हेंबर रोजी याच अनुषंगाने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल यांनी दिली आहे.

हरकतीही नोंदवून घेणार

नाशिक शहरात मतदार यादीमध्ये दुबार नावे घुसविल्याची तक्रार आहे. तसे प्रकार इतरत्र घडले आहेत का किंवा मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना काही हरकती असल्यास अथवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदवावयाचे असल्यास त्यांना तसा अर्ज ग्रामसभेत उपलब्ध होणार आहे. मृत मतदार, कायम स्थलांतरित मतदारांच्या नावांची वगळणी होणार आहे. तसेच लग्न होवून गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकीत करणे व ज्यांचे 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे, त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्याच्या कामावर भर देण्यात येणार आहे.

ऑनलाईन नोंदणीची माहिती

ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक आणि संबंधित गावातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नागरिकांना अर्ज भरण्‍याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या हरकती, आक्षेप, दुरुस्ती व नाव नोंदणी अर्ज एकत्र करून ग्रामपंचायत कार्यालय संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच या विशेष ग्रामसभेमध्ये नागरिकांना ऑनलाईन नाव नोंदणी nvsp portal व voter helpline App वरुन कशी करता येते, याबाबत देखील माहिती देण्यात येणार आहे.

27, 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विशेष मतदार नोंदणीसाठी संबंधित ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे 16 नोव्हेंबर रोजीच्या विशेष ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त जणांनी सहभागी होवून मतदार यादीतील आपल्या नावाबाबत खातरजमा करुन मतदार यादी शुध्दीकरणास सहकार्य करावे. – स्वाती थविल, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी

(Organizing a special camp and gram sabha in Nashik district for registration and correction of names in the voter list)

इतर बातम्याः

जनतेला न्याय मिळेल या भूमिकेतून जिल्हाधिकाऱ्यांनी काम करावे; महसूल मंत्री थोरातांचे राज्यस्तरीय महसूल परिषेत आवाहन

अजित पवारांच्या मामांसह त्यांच्या अवतीभोवती असलेल्यांची चौकशी होणार, 4 दिवसांत 4 ठिकाणी प्रकरणं बाहेर येणार; सोमय्यांच्या दाव्यांचा चौकार

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.