Elections | उस्मानाबाद जिल्ह्यात 8 नगर परिषदांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर, काय आहेत तारखांचं गणित?

उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद या अ वर्ग नगर परिषद तर तुळजापूर, भूम, परांडा, उमरगा, कळंब, नळदुर्ग व मुरूम या 7 क वर्ग नगर परिषदांसाठी निवडणूक होत आहे.

Elections | उस्मानाबाद जिल्ह्यात 8 नगर परिषदांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर, काय आहेत तारखांचं गणित?
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 1:10 PM

उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 नगर परिषदेसह (Municipal Council ) राज्यातील अ, ब, व क वर्गातील 208 नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव 2 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे तर 1 एप्रिल 2022 रोजी निवडणूक आयोग (Maharashtra Election Commission) अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad District) उस्मानाबाद या अ वर्ग नगर परिषद तर तुळजापूर, भूम, परांडा, उमरगा, कळंब, नळदुर्ग व मुरूम या 7 क वर्ग नगर परिषदांसाठी निवडणूक होत आहे. राज्यात एप्रिल 2020 ते मार्च 2022 या काळात मुदत संपलेल्या व नवनिर्मित अशा 208 नगर परिषद सदस्यांच्या म्हणजेच नगरसेवकांच्या निवडीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात प्रत्येक प्रभागातून 2 सदस्य नगरसेवक म्हणून निवडले जाणार आहेत. प्रभागाची सिमा दर्शविणारी अधिसूचना प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविणे, सुनावणी घेणे आदी प्रक्रिया मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे. निवडणुकीकरिता 2011 ची जनगणना आकडेवारी वापरण्यात येणार आहे. आरक्षण व त्याच्या सोडतीचा कार्यक्रम हा नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

उस्मानाबादेत 8 नगरपरिषदांची निवडणूक

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व 8 नगर परिषदांची पंचवार्षिक निवडणूक 27 नोव्हेंबर 2016 रोजी झाली होती. उस्मानाबाद अ वर्ग व कळंब या क वर्ग नगर परिषदेच्या नगरसेवकांची पहिली सभा 31 डिसेंबर 2016 रोजी झाली होती तर मुदत 30 डिसेंबर 2021 रोजी संपली आहे. भूम नगर परिषदेच्या नगरसेवकांची पहिली सभा 30 डिसेंबर 2016 रोजी झाली होती तर मुदत 29 डिसेंबर 2021 रोजी संपली आहे.मुरूम,नळदुर्ग,उमरगा व परांडा या 4 क वर्ग नगर परिषदेच्या नगरसेवकांची पहिली सभा 30 डिसेंबर 2016 रोजी झाली होती तर मुदत 29 डिसेंबर 2021 रोजी संपली आहे. तुळजापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांची पहिली सभा 2 जानेवारी 2017 रोजी झाली होती तर मुदत 1 जानेवारी 2022 रोजी संपली आहे.

1 एप्रिल पर्यंत प्रभाग रचनेस अंतिम मान्यता

प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव ज्यात नगर परिषद प्रभागांची संख्या, प्रभागनिहाय अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या,क्षेत्र , सिमांकन व नकाशा याचा प्रस्ताव संबंधित मुख्याधिकारी यांनी 2 मार्च 2022 पर्यंत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे. प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला राज्य निवडणूक आयुक्त 7 मार्च 2022 पर्यंत मान्यता देतील. प्रारूप प्रभाग रचना व प्रभागदर्शक नकाशे अधिसूचना कलम 10 नुसार प्रसिद्ध केले जातील व त्यावर 10 मार्च पर्यंत हरकती व सूचना मागविण्या करिता ते प्रसिद्ध केले जातील. हरकती व सूचना या 10 मार्च 2022 ते 17 मार्च 2022 या काळात मागविण्यात येतील. प्राप्त हरकती व सूचनावर 22 मार्च पर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी घेतील त्यावर हरकती व सूचनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिप्राय देऊन त्यांचा अहवाल 25 मार्च पर्यंत निवडणूक आयोगाकडे पाठवतील. 1 एप्रिल 2022 पर्यंत राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील व त्यानंतर अंतिम अधिसूचना जिल्हाधिकारी 5 एप्रिल पर्यंत वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी व नगर परिषदांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करतील असे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी काढले आहेत. या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी पेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकारी यांची नेमणूक करावी.

इतर बातम्या-

“तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार”, फोटो शेअर करत वैदेही परशुरामीकडून जगण्याचा मूलमंत्र

Latur Crime : वृध्द शेतकऱ्याने केले नको ते धाडस, पोलीस पोहचले थेट शेताच्या बांधावर अन्….

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.