राज्यातील शाळा बंद राहण्याची शक्यता, कारण काय?

राज्य सरकारनं शाळेतील शिपायांची पदं रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी आज राज्यातील शाळांनी बंद पाळावा असं आवाहन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केलं आहे.

राज्यातील शाळा बंद राहण्याची शक्यता, कारण काय?
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 7:52 AM

उस्मानाबाद: राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं शाळेतील शिपाई पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात आज राज्यातील सर्व शाळांनी बंद पुकारावा असं आवाहन मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केलंय. कंत्राटी शिपाई नेमल्यास अनेक प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे राज्यातील 52 हजार शिपायांच्या नोकरीवर गंडांतर आणणारा हा निर्णय रद्द करावा अशी मागणी आमदार काळे यांनी केली आहे. (Appeal to close schools against the decision to cancel the post of school peon)

शाळेत मुली असतात, तसेच संगणकांसह अनेक वस्तू असतात अशावेळी कंत्राटी शिपाई नेमल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतील. त्यामुळे राज्य सरकारनं शाळेतील शिपायांची पदं रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी आज राज्यातील शाळांनी बंद पाळावा असं आवाहन विक्रम काळे यांनी केलं आहे. विक्रम काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरुद्ध स्वपक्षीय आमदाराकडूनच शाळा बंद पाळण्याचं आवाहन केलं जात आहे.

सरकारने 11 डिसेंबर 2020 रोजी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसंदर्भात काढलेल्या शासन निर्णयाविरोधात आज उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून जाहीर निषेध नोंदवावा असं आवाहन उस्मानाबाद जिल्हा खासगी शिक्षण संस्थाचालक संघानेही केलं आहे. या संघाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सचिव अशोक मोहेकर, अशोक पवार, पांडुरंग लाटे, धनंजय शिंगाडे यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व शाळांनी बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

शासन निर्णय काय?

राज्यातील अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे. सध्या कार्यरत असलेलेल चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रद्द होतील. त्यांची नवीन भरती करण्याऐवजी शाळांना ठोक स्वरुपात शिपाई भत्ता दिला जाणार आहे. यात शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाई कामगार, प्रयोगशाळा परिचर आदींचा समावेश आहे.

या निर्णयानुसार राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमधील शिपायांची पदं भरता येणार नाहीत. त्या ऐवजी गरज असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या कंत्राटी तत्वावर शिपाई दिला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयावर सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra school reopening date कोणत्या जिल्ह्यात शाळा सुरु होणार आणि कोणत्या जिल्ह्यात नाही?

School Teachers Corona | उस्मानाबादेत 48, बीडमध्ये 25, कोणत्या जिल्ह्यात किती शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह?

Appeal to close schools against the decision to cancel the post of school peon

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.