उस्मानाबाद जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा सफाया, ओमराजे निंबाळकरांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा विजयी गुलाल

उस्मानाबाद जिल्ह्यात महाविकास आघाडीचा हा पहिला मोठा विजय आहे. महाविकास आघाडीतील काही मते परांडा व तुळजापूर तालुक्यात फुटल्याने महाविकास आघाडीतील घरचा भेदी कोण याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाला प्रत्येकी 5 जागा मिळाल्या.

उस्मानाबाद जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा सफाया, ओमराजे निंबाळकरांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा विजयी गुलाल
उस्मानाबाद जिल्हा सहाकारी बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 3:12 PM

उस्मानाबादः उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Osmanabad District co operative bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 15 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. तर भाजपचा पूर्ण सफाया झाला आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह (Ranajagjitsingh Patil) पाटील यांच्या नेतृत्वातील भाजप पॅनलचा दारुण पराभव झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) हा पहिला मोठा विजय आहे. महाविकास आघाडीतील काही मते परांडा व तुळजापूर तालुक्यात फुटल्याने महाविकास आघाडीतील घरचा भेदी कोण याची जोरदार चर्चा होत आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाला प्रत्येकी 5 जागा मिळाल्या.

आजच्या निकालाचे चित्र काय?

प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सोसायटी उस्मानाबाद मतदार संघातून शिवसेनेचे नानासाहेब व्यंकटराव पाटील हे विजयी झाले. नानासाहेब पाटील यांना 50 मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार चंद्रकांत कदम यांना 28 मते पडली. कळंब तालुक्यात शिवसेनेचे बळावंत तांबारे हे विजयी झाले, तांबारे यांना 40 तर विरोधक श्रावण सावंत यांना 29 मते पडली. लोहारा तालुक्यात काँग्रेसचे नागप्पा पाटील विजयी झाले त्यांना 28 मते तर प्रतिस्पर्धी राहुल पाटील यांना 10 मते मिळाली. इतर शेती संस्था मतदार संघात शिवसेनेचे संजय गौरीशंकर देशमुख हे विजयी झाले त्यांना 116 मते मिळाली तर भाजपचे सतीश दंडनाईक यांना 83 मते मिळाली. नागरी बँका पतसंस्था गटात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान चेअरमन सुरेश बिराजदार हे 96 मते घेत विजयी झाले त्याचे विरोधक सुधीर पाटील यांना 51 मते मिळाली. अनुसूचित जाती मतदार संघात संजय रामचंद्र कांबळे हे 429 मते घेत विजयी झाले त्यांनी विद्यमान उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचा पराभव केला, त्यांना 359 मते पडली.इतर मागास प्रवर्ग गटात मेहबुबपाशा पटेल 502 मते घेत विजयी झाले त्याचे प्रतिस्पर्धी विजय शिंगाडे यांना 283 मते मिळाली. विमुक्त जाती गटात संजीव वसंतराव पाटील 466 मते घेत विजयी झाले त्याचे विरोधक वैभव मुंडे यांना 323 मते मिळाली. महिला राखीव मतदार संघात काँग्रेसच्या अपेक्षा प्रकाश आष्टे 443 व प्रविणा हनुमंत कोलते 446 मते घेत विजयी झाल्या त्यांच्या प्रतिस्पर्धी सुवर्णा कोळगे 325 मते व उषा टेकाळे यांना 324 मते पडली. भूम तालुका सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे मधुकर मोटे,परंडा तालुका सोसायटी गटातून शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, उमरगा तालुका सोसायटी गटातून काँग्रेसचे नेते तथा माजी चेअरमन बापूराव पाटील,वाशी तालुका सोसायटी गटातून शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे विक्रम सावंत आणि तुळजापूर तालुका सोसायटी गटातून काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण बिनविरोध निवडून गेले आहेत.

ओमराजे निंबाळकरांची भाजपवर टीका

पक्ष काय असतो याची ताकत राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्या राणाजगजीतसिंह पाटील यांना आज कळाली असेल अशी टीका शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली. एखाद्या पराभवामुळे 40 वर्ष ज्या पक्षाने सत्ता दिली त्याला सोडून राणा पाटील हे भाजपात गेले. ग्रामपंचायतलाही निवडून न येता त्यांना शरद पवार यांनी थेट राज्यमंत्री केले, त्या पक्षाला सोडणाऱ्या नेत्यांना जिल्हा बँक निवडणुक धडा घेण्यासारखी आहे .पक्ष संघटना व कार्यकर्ते काय असतात हे त्यांना समजलx असेल, अशी टिका खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली .

हा तर जनशक्तीचा धनशक्तीवरील विजय- शिवसेना आमदार

महाविकास आघाडीचा विजय म्हणजे जनशक्तीचा धनशक्तीवर केलेला विजय असल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी दिली. जिल्हा बॅक निवडणुक निकाल म्हणजे पैशाच्या बळावर कोणतीही निवडणुक जिंकता येते म्हणणाऱ्या व स्वहट्टासाठी जाणीवपूर्वक बिनविरोधला खोडा घालून अमाप पैशाचा वापर करणाऱ्या विरोधकांना चपराक आहे, अशी टिका शिवसेना आमदार कैलास घाडगे- पाटील यांनी भाजप आमदार राणा पाटील यांच्यावर केली.

उस्मानाबाद जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विजयी उमेदवार सुरेश बिराजदार यांनी सांगितले.

इतर बातम्या-

“मोठ्या पडद्यावर जिममध्ये कसलेली बॉडी दाखवू शकतो मग बेबी बंप का नाही?”; नेहा धुपियाचा परखड सवाल

फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचा षटकार, उपनेतेपदी बागुल; नाशिक महापालिकेची धुरा खांद्यावर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.