कोरोनाने कुटुंबाचे दोन आधारस्तंभ निखळले, उस्मानाबादेत पत्रकार भावांचा मृत्यू

एका धक्क्यातून बेदमुथा कुटुंब सावरत नाही, तोच अवघ्या 8 दिवसात पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला (Osmanabad Journalist Brothers Dies of Corona)

कोरोनाने कुटुंबाचे दोन आधारस्तंभ निखळले, उस्मानाबादेत पत्रकार भावांचा मृत्यू
(डावीकडे) विजयकुमार बेदमुथा आणि मोतीचंद बेदमुथा
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 3:27 PM

उस्मानाबाद : कोरोनाच्या संकटकाळात एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांवर काळाने घाला घालण्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. उस्मानाबाद येथील बेदमुथा कुटुंबातील दोघा भावांचा अवघ्या 8 दिवसांच्या अंतराने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना संसर्गानंतर हैद्राबादमध्ये उपचारादरम्यान दोघांची प्राणज्योत मालवली. दोघंही भाऊ पेशाने पत्रकार होते. (Osmanabad Journalist Bedmutha Brothers Dies of Corona during treatment in Hyderabad)

पत्रकार विजयकुमार बेदमुथा (Vijay Kumar Bedmutha) यांचे कोरोनावरील उपचारादरम्यान काल हैद्राबाद येथे निधन झाले. 22 एप्रिल रोजी त्यांचे बंधू आणि ज्येष्ठ संपादक मोतीचंद बेदमुथा (Motichand Bedmutha) यांचेही कोरोना उपचारादरम्यान निधन झाले होते. एका धक्क्यातून बेदमुथा कुटुंब सावरत नाही, तोच अवघ्या 8 दिवसात पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला.

सख्ख्या पत्रकार भावांची जोडी

मोतीचंद आणि विजयकुमार ही दोन सख्ख्या भावांची जोडी पत्रकारिता क्षेत्रात प्रसिद्ध होती. अवघ्या 8 दिवसात हे दोन तारे निखळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

विजय बेदमुथा यांचे सामाजिक कार्य

गेली अनेक वर्ष विजय बाबू यांनी पत्रकारिता क्षेत्रात दैनिक लोकमत, पुढारी या वृत्तपत्रांच्या माध्यमातून राज्य पातळीवर कार्य केले होते. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पत्रकारांच्या अनेक पिढ्याही घडल्या आहेत. अत्यंत धार्मिक आणि परोपकारी वृतीचे अशी त्यांची ओळख होती. भारतीय जैन संघटनेद्वारा त्यांनी भूकंप, दुष्काळ, जलसंधारणाचे कार्य केले आहे. तर मोतीचंद बेदमुथा यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करत दैनिक समय सारथी वृत्तपत्राचे संपादकपद भूषवले होते.

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने बेदमुथा भावांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विजय बाबू यांच्यावर हैद्राबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या :

पूजेनिमित्त एकत्र येणारं जाधव कुटुंब 15 दिवसात कोरोनाने संपवलं, पुणेकरांनो सावध व्हा

लोकप्रिय न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं निधन, कोरोनावरील उपचारादरम्यान हृदयविकाराचा धक्का

मि. इंडिया, मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनाने निधन

(Osmanabad Journalist Bedmutha Brothers Dies of Corona during treatment in Hyderabad)

Non Stop LIVE Update
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.