लेडी कंडक्टर, ऑन ड्युटी रिल्स, मंगल गिरींना दिलासा, दबाव की लोकप्रियता?

1 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. अखेर 13 ऑक्टोबर रोजी एसटी महामंडळाच्या वतीने दोन ओळींचं पत्र देण्यात आलं.

लेडी कंडक्टर, ऑन ड्युटी रिल्स, मंगल गिरींना दिलासा, दबाव की लोकप्रियता?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 14, 2022 | 11:49 AM

संतोष जाधव, उस्मानाबादः उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगल गिरी (Mangal Giri) या लेडी कंडक्टर (Lady Conductor) तसेच वाहक यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. ड्युटीवर असताना राज्य परिवहन विभागाची वर्दी घालून रिल्स (reels) बनवल्या प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. पण सोशल मीडियात प्रचंड लोकप्रिय असलेल्या मंगल गिरींवर कारवाई केल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर त्यांचं निलंबन रद्द करण्यात आलंय.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि अजित पवार यांनीदेखील मंगल गिरी यांच्या निलंबनावर नाराजी दर्शवली होती.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब आगारात मंगल गिरी कार्यरत होत्या. त्यांच्यासोबत वाहतूक नियंत्रक कल्याण आत्माराम कुंभार यांचंही निलंबन करण्यात आलं होतं. मात्र ते रद्द करण्यात आलंय.

मंगल गिरी यांनी विविध गाण्यांवर व्हिडिओ तयार केले होते. सोशल मीडियावर ते प्रचंड शेअर्स केला जातात. त्यांच्या काही व्हिडिओवर आक्षेप घेण्यात आला होता.

या व्हिडिओत त्यांनी एसटी महामंडळाची वर्दी घालून अभिनय केला होता. अशा व्हिडिओंमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन होत असल्याचं सांगत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

वाहन हे लोकांच्या सोयीसाठी असते, वाहनात बसून त्यांनी ड्राइवर सीटवर बसून काही व्हिडिओ बनविले आहेत, जर वाहन सुरु झाले असते तर अनुचित प्रकार घडला असता त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे वर्तन हे चुकीचे होते, अशी भूमिका त्यावेळी विभागीय नियंत्रकांनी त्यावेळी दिली होती.

माझ्यावर झालेली कारवाई चुकीची असून इतरांवरही तशी कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंगल गिरी यांनी दिली होती. सोशल मीडियावरील त्यांच्या फॉलोअर्सनीही प्रचंड रोष व्यक्त केला होता.

1 ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. अखेर 13 ऑक्टोबर रोजी एसटी महामंडळाच्या वतीने दोन ओळींचं पत्र देण्यात आलं.

त्यात त्यांच्यावरील निलंबन मागे घेण्यात आल्याचं कळवण्यात आलं. हा दिलासा मंगल गिरी यांच्या लोकप्रियतेमुळे मिळाला की कुणाच्या दबावाखाली, हा प्रश्न कायम आहे. तसेच यापुढे त्यांनी व्हिडिओ बनवताना कोणत्या नियमांचं पालन करावं, असेही काही निर्देश देण्यात आलेले नाहीत.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.