Osmanabad | 26 हजारांची लाच घेणाऱ्या दोघांना अटक, उस्मानाबादेत ACB ची कारवाई

औरंगाबाद लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी अशोक हुलगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Osmanabad | 26 हजारांची लाच घेणाऱ्या दोघांना अटक, उस्मानाबादेत ACB ची कारवाई
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 2:29 PM

उस्मानाबादः 26 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोघांना उस्मानाबादेत (Osmanabad) बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ही कारवाई (Police arrest) करण्यात आली. सोमवारी रात्री उशीरा पोलिसांनी ही कारवाई केली. अंगणवाडी केंद्रांना (Anganwadi) पुरवठा केलेल्या पोषण आहाराचे बिल काढण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आली. अंगणवाडी केंद्रांना पुरवठा केलेल्या पोषण आहाराचे बिल काढण्यासाठी 26 हजार रुपयांची लाच घेताना बालविकास प्रकल्प अधिकारी व कनिष्ठ सहायक या दोघांना उस्मानाबाद लाच लुचपत विभागाने अटक केली आहे. यानिमित्ताने पोषण आहार योजनेतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तीन वेळा मागितली लाच..

एका तक्रारदार महिलेकडून एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प वाशी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी सतिश उद्धवराव मुंढे व कनिष्ठ सहायक शहाबुद्दीन महमंद शेख यांनी 32 हजारांची लाचेची मागणी करून 26 हजार रुपये लाच घेतली. या प्रकरणात तब्बल 3 वेळेस लाच मागणी करण्यात आल्याने अखेर फिर्यादी महिलेने यांना चांगलाच धडा शिकविला. 30 मार्च, 22 व 25 एप्रिल रोजी लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदार यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प वाशी अंतर्गत वाशी येथील अंगणवाडी केंद्रांना पुरवठा केलेल्या पोषण आहाराचे बिल काढण्यासाठी तसेच यापूर्वी काढलेल्या बिलाचा मोबदला म्हणून मुंडे यांनी 24 हजार रुपयाची मागणी करून पहिला हफ्ता म्हणून 20 हजार घेतले तर शेख यांनी स्वतः साठी 8 हजार मागणी करून 6 हजार रुपये घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सापळा रचून पकडले

औरंगाबाद लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी अशोक हुलगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सापळा पथकात पोअ शिधेश्र्वर तावसकर, विशाल डोके ,विष्णु बेळे ,अविनाश आचार्य, चालक दत्तात्रय करडे यांनी काम केले.

 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.