निपाणीहून पंढरपूरला चालली होती गाडी, पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी लागली अन्…

निपाणीहून सर्वजण पंढरपूरला चालले होते. मात्र रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठमहंकाळ तालुक्यात येताच चालकाला डुलकी लागली आणि घात झाला.

निपाणीहून पंढरपूरला चालली होती गाडी, पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी लागली अन्...
सांगलीत क्रूझर गाडीचा अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 2:55 PM

सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्यावर पहाटे भीषण अपघात झाला. या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. क्रूझर गाडी चालकाला डुलकी लागल्याने गाडी टोल नाक्याच्या डिव्हायडरला जाऊन धडकली आणि गाडी पलटी झाली. या गाडीतील जवळपास 13 जण जखमी झाले आहेत. सर्वांना मिरजेच्या आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चालकाला डुलकी लागली अन् घात झाला

निपाणीहून 13 क्रूझर गाडीने पंढरपूरला चालले होते. पहाटेची वेळ असल्याने चालकाला झोप अनावर होत होती. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव टोल नाक्यावर येताच चालकाला डुलकी लागली अन् अनर्थ घडला. गाडी टोल नाक्याच्या डिव्हायडरला धडकून पलटी झाली. पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही भीषण घटना घडली. सर्व घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

टोलनाक्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत गाडीतील लोकांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाडीतील सर्व प्रवासी जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

नगरमध्ये करंजी घाटात ट्रकला अपघात

अहमदनगरला विशाखापटनम राष्ट्रीय महामार्गावर करंजी घाटात ट्रकचा ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून, क्लीनर बचावला आहे. नगरहून बीडकडे रासायनिक खत घेऊन जाणारा ट्रक सकाळी सात वाजण्याच्या सुमारास करंजी घाटातून जात असताना चालकाचा माणिक शहा दर्ग्याजवळ असलेल्या वळणावर ताबा सुटला. ट्रक 25 फूट खोल दरीमध्ये कोसळला. यात केज तालुक्यातील शैलेश लोंढे या चालकाचा मृत्यू झाला आहे. तर ट्रक दरीत कोसळल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.