Anti-Naxal Campaign : गडचिरोलीत 3 जहाल नक्षलींना अटक, 10 लाख रुपयांचे होते बक्षीस

दोघांवरही प्रत्येकी 4 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस होते. या तीन नक्षलवाद्यांवर एकूण दहा लाख रुपयांचे बक्षीस होते.

Anti-Naxal Campaign : गडचिरोलीत 3 जहाल नक्षलींना अटक, 10 लाख रुपयांचे होते बक्षीस
गडचिरोलीत 3 जहाल नक्षलींना अटकImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 6:46 PM

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग असलेला भामरागड अंतर्गत येणा­ऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. विशेष अभियान पथक (सी-60) व सीआरपीएफ बटालियन 37 चे जवान संयुक्त नक्षल विरोधी अभियान (Anti-Naxal Campaign) कोयार जंगल परिसरात राबवित होते. दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. उपविभाग हेडरी अंतर्गत पोमके गट्टा (जां) हद्दीतील झारेवाडा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. एका जहाल नक्षलवाद्यांस अटक करण्यात आले. गडचिरोली पोलीस दलाचे (Police Force) जवानांना यश प्राप्त झाले आहे. सदर नक्षलवाद्यांना दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अटक करण्यात आली. कोयार जंगल (Koyar Jungle) परिसरामध्ये अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये रमेश पल्लो व तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी यांचा समावेश आहे. दोघांवरही प्रत्येकी 4 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते. अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे याच्यावर दोन लाख रुपयांचे बक्षीस होते. या तीन नक्षलवाद्यांवर एकूण दहा लाख रुपयांचे बक्षीस होते.

आतापर्यंत 57 जहाल नक्षलवाद्यांना अटक

गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे 2021-22 या दोन वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत एकूण 57 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडली.

नक्षली चळवळीला धक्का

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले. नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे. तीन नक्षलवाद्यांना अटक करण्यात आल्यानं नक्षली चळवळीला मोठा धक्का मानला जात आहे.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.