Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेळघाटात 3 महिन्यांत 49 बालकांचे मृत्यू, उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीची पावलं

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये गेल्या 3 महिन्यात 49 बालकांचा मृत्यू झालाय. यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकरला फटकारत बालमृत्यू झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार राहील अशी तंबी दिलीय.

मेळघाटात 3 महिन्यांत 49 बालकांचे मृत्यू, उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीची पावलं
मेळघाट, अमरावती
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 11:05 AM

अमरावती : जिल्ह्यातील मेळघाटमध्ये गेल्या 3 महिन्यात 49 बालकांचा मृत्यू झालाय. यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकरला फटकारत बालमृत्यू झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार राहील अशी तंबी दिलीय. राज्य सरकारने दखल घेत 15 दिवसांकारिता बालरोग, स्त्रीरोग तज्ञांची नियुक्ती केलीय. 15 दिवसात बालमृत्यू, कुपोषण आटोक्यात येईल का?, असा प्रश्न स्थानिकांना भेडसावतो आहे..

मेळघाटमध्ये कुपोषणाची समस्या कायम

गेल्या अनेक दशकांपासून मेळघाटमध्ये कुपोषणाची समस्या कायम आहे. गेल्या 3 महिन्यात 49 बालमृत्यू झालेत. मेळघाट हा घनदाट जंगलाचा परिसरआहे. या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

खासदार नवनीत राणांकडून मेळघाटाची समस्या संसदेत

अज्ञानी आदिवासी उपचाराकरिता भोंदूबाबाचा आधार घेतात. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू संदर्भात लोकसभेत लक्षवेधी केली. तर या संदर्भात केंद्रीयमंत्री स्मृर्ती इराणी यांची भेट घेऊन मेळघाटच्या समस्या माडल्यात. केंद्राचा पाठपुरावा झाल्याने अकोला आरोग्य उपसंचालक यांच्याकडून मेळघाट परिसरात स्त्री रोग, बालरोगतज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र मेळघाट परिसरात कायमस्वरूपी तज्ञ डॉक्टरची नियुक्ती देण्यात यावी अशी विनंती आमदार रवी राणा यांनी केलीय.

दोन तालुक्यांत कायम तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असायला हवी

सद्यातरी मेळघाट परिसरात आदिवासींना उपचार घ्यायचा असेल तर जंगलातून वाट काढत जावं लागतं. मेळघाटात चिखलदरा व धारणी या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मात्र सुविधा व डॉक्टरांचा अभाव आहे. या ठिकाणी कुपोषणाच्या समस्यासह लहान मुलांना पोटफुगी सारखे आजार आहेत. त्यामुळे या ठिकाणी कायम स्त्री रोग,व बालरोग तज्ञ असायला हवा, असं स्थानिक आदिवासी लोकांचं म्हणणं आहे.

महिला व बालकल्याण खातं हे अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे आहेत. त्यांनी बालमृत्यूसंदर्भात आढावा घेतला आहे. तर मेळघाट मधील बालमृत्यू प्रमाण थांबव याकरिता अभियान राबविण्यात येतंय. मात्र कुपोषण व मेळघाटातील विविध आजारांवर उपचारासाठी या ठिकाणी कायम डॉक्टर असतील का? हा खरा प्रश्न आहे.

(49 children death in Melghat in 3 months, HC Slam state government)

हे ही वाचा :

मेळघाटातला आदिवासी बांधवांचा घुंगरु बाजार, स्वतंत्र परंपरा आणि संस्कृती जतन करण्याचा निर्धार

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.