चांदिची गदा, स्कॉर्पियो, बुलेट, आणि अनेक आकर्षक बक्षिसं, ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार ‘या’ जिल्ह्यात रंगणार

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा पुढचा थरार आता कोणत्या जिल्ह्यात बघायला मिळेल, याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज याबाबत घोषणा केली आहे.

चांदिची गदा, स्कॉर्पियो, बुलेट, आणि अनेक आकर्षक बक्षिसं, 'महाराष्ट्र केसरी'चा थरार 'या' जिल्ह्यात रंगणार
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 9:10 PM

धाराशिव : 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार धाराशिवमध्ये रंगणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये या कुस्ती स्पर्धा होणार आहेत. लाल माती आणि मॅट या 2 गटात या स्पर्धा होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पाहणी केली आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा धाराशिवमध्ये होणार असल्याची घोषणा केली. 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक हे लवकरच जाहीर केले जाणार आहे. मानाची चांदीची गदा, स्कॉर्पियो, 25 बुलेट, रोख रक्कम अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, कार्यालयीन सचिव ललित लांडगे, उपाध्यक्ष दयानंद भक्त, तांत्रिक सचिव बंकट यादव, अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त विजेते काकासाहेब पवार, हातलाई कुस्ती संकुलचे संस्थापक अध्यक्ष सुधीर पाटील, भारतीय खो खो महासंघाचे सचिव चंद्रजीत जाधव, अभिराम आणि आदित्य सुधीर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

धाराशिव आणि लातूर जिल्हाधिकारी एकत्र असताना 25 नोव्हेंबर 1969 साली लातूर शहरात डालडा मैदान येथे या स्पर्धा झाल्या होत्या. त्यावेळी पैलवान हरिश्चंद्र बिराजदार यांना मानाची चांदीची गदा मिळाली होती. ते महाराष्ट्र केसरी ठरले होते. यावर्षीच्या स्पर्धेचे यजमानपद हे धाराशिव जिल्ह्याला मिळाले आहे. महाराष्ट्रातील कुस्ती खेळाडूंना यात संधी मिळणार असून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

लाल माती आणि गादी अशा 20 विविध वजनाच्या गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत 45 संघ असून 900 खेळाडू, 150 पंच, तांत्रिक अधिकारी सहभागी असणार आहेत. 50 हजार ते 1 लाख प्रेक्षक रोज हजर राहणार आहेत. कुस्ती खेळाडू आणि कुस्ती प्रेमीसाठी हा एक प्रकारचा कुंभ मेळावा असतो. या स्पर्धेचे देशात आकर्षण असते. धाराशिव शहरातील तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे या स्पर्धा होणार आहेत.

धाराशिव जिल्हा तालीम संघ, सुधीर अण्णा पाटील मित्र परिवार, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, हातलाई कुस्ती संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....