VIDEO : बटरफ्लाय, ब्रेस्ट स्ट्रोक ते बॅकस्ट्रोक, 72 वर्षीय आनंदीबाई आजींचा कॅनॉलमध्ये सूर

आपल्या नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी आनंदीबाई एका दमात कॅनॉल पार करुन आपलं कसबही दाखवतात. त्यांची ही पोहण्याची कला पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरतेय.

VIDEO : बटरफ्लाय, ब्रेस्ट स्ट्रोक ते बॅकस्ट्रोक, 72 वर्षीय आनंदीबाई आजींचा कॅनॉलमध्ये सूर
Baramati Swimmer grandma
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 12:05 PM

बारामती (पुणे) : हौसेला वयाचं अन वेळेचं बंधन नसतं असं म्हटलं जातं. तशी अनेक उदाहरणं आपल्याला पहायला मिळत असतात. बारामतीत सध्या एका 72 वर्षीय आजींचा बोलबाला सुरु आहे. कारण सध्या उन्हाळ्याच्या दिवसात विहिरी, कॅनॉलवर पोहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होत असतानाच बारामती तालुक्यातील मळशी परिसरात या आजी कॅनॉलमध्ये पोहताना दिसतात. आपल्या नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी आनंदीबाई एका दमात कॅनॉल पार करुन आपलं कसबही दाखवतात. त्यांची ही पोहण्याची कला पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरतेय. (72 years Swimmer grandma Anandibai Sartape Baramati )

72 वर्षीय आनंदीबाई सरतापे. बारामती तालुक्यातल्या मळशी गावच्या रहिवाशी. त्या सध्या चर्चेत आल्यात ते त्यांच्या पोहण्याच्या कलेमुळे. 72 व्या वर्षीही एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा उत्साहात या आजी कॅनॉल सहजपणे आरपार करतात. तसं पाहिलं तर कॅनॉल आरपार करणं ही सोपी गोष्ट नाही. पण या आजी सहजतेनं कॅनॉल पार करतात म्हटल्यावर चर्चा तर होणारच. या आजी लहानपणापासून पोहायला शिकल्या. आता नातवाच्या हट्टासाठी त्या पुन्हा पोहायला लागल्याचं सांगतात.

आधी व्यायाम म्हणून सरपण आणायच्या

आता आजी पाण्यात उतरली म्हटल्यावर नातवाला आनंद झाला. परंतु मुलाला मात्र भीती वाटली आणि आश्चर्य देखील वाटलं. आधी रोज आजी सरपण आणायला जायची, ती व्यायाम म्हणून. पण आता आजीने सरपण आणणे बंद केलं आजी रोज कॅनॉलमध्ये पोहायला जातेय. त्यामुळं आपल्यासाठीही हा आश्चर्याचा धक्काच असल्याचं आजीबाईंचा मुलगा तात्या सरतापे सांगतो.

ना कोणता आजार, ना त्रास

आजी 72 वर्षांच्या आहेत, पण एखाद्या पट्टीच्या पोहोणाऱ्याला लाजवतील असं या आजी पोहोतात. सुनेला पोहोता येत नाही पण आजी मनसोक्त पोहोण्याचा आनंद घेतात. या वयात आजी ठणठणीत आहेत. आजीला कोणताच आजार नाही ना कोणता त्रास, असं या आजींच्या सूनबाई सांगतात.

लहानपणाचा छंद आता 72 व्या वर्षी जोपासत या आजीबाईंनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. आपल्या नातवाच्या हट्टापायी का होईना त्या आपला छंद जपतानाच कॅनॉल पार करण्यासारख्या अवघड कसरतीही करत आहेत. त्यामुळंच सध्या या आजीबाईंचा सर्वत्र बोलबाला झालाय.

VIDEO : 72 वर्षीय आजीचा कालव्यात सूर 

संबंधित बातम्या 

माणुसकीची मिठी आणि जिव्हाळ्याची साथ, हंबरडा फोडणाऱ्या गर्भवतीला डॉक्टरचा शब्द, ताई घाबरु नको!

धक्कादायक! रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी खिशातून 35 हजार रुपये चोरले

(72 years Swimmer grandma Anandibai Sartape Baramati )

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.