Sangli Crime : सांगलीत रस्ताच्या कडेला बेवारस स्त्री जातीचे बाळ सापडले

बलगवडे ते वायफळे रस्त्यालगत गावाबाहेर रस्ताच्या कडेला हे बाळ दाट झाडीत फेकून दिलेले ग्रामस्थांना आढळले. बाळाच्या तोंडाला छोटीशी जखम झाली होती. बाळाच्या कपड्याला धूळ, कुसळे व काटे लागले होते. बाळ थंडीने कुडकडत जोरजोरात रडत होते. सकाळच्या सुमारास व्यायामासाठी गेलेल्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट आली.

Sangli Crime : सांगलीत रस्ताच्या कडेला बेवारस स्त्री जातीचे बाळ सापडले
सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 3:01 PM

सांगली : सांगलीच्या तासगाव तालुक्यातील बलगवडे येथे वायफळे रस्त्यालगत बेवारस टाकून दिलेले स्त्री जातीचे चार महिन्यांचे बाळ (Baby) सापडले आहे. गावातील लोकं सोमवारी पहाटे 6 च्या दरम्यान व्यायामाला जात असताना रस्ताच्या कडेला हे बाळ आढळून आले. ग्रामस्थांनी तात्काळ हे बाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्रथम उपचार करून तासगाव पोलिसां (Tasgaon Police)च्या ताब्यात दिले. तासगाव पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील उपचारासाठी बाळास सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. (A female baby was found on the side of the road in Sangli)

दाट झाडीत फेकून दिले होते बाळ

बलगवडे ते वायफळे रस्त्यालगत गावाबाहेर रस्ताच्या कडेला हे बाळ दाट झाडीत फेकून दिलेले ग्रामस्थांना आढळले. बाळाच्या तोंडाला छोटीशी जखम झाली होती. बाळाच्या कपड्याला धूळ, कुसळे व काटे लागले होते. बाळ थंडीने कुडकडत जोरजोरात रडत होते. सकाळच्या सुमारास व्यायामासाठी गेलेल्या लोकांच्या लक्षात ही गोष्ट आली. सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील, राजेंद्र रास्ते, सूरज शिंदे यांनी तातडीने त्याला गावातील उपकेंद्रात नेले. आरोग्य कर्मचारी शुभांगी मोहिते आणि हेमलता जगताप यांनी प्रथमोपचार केले.

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

यानंतर माजी पोलीस पाटील रघुनाथ पाटील, सरपंच जयश्री पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यास याबाबत माहिती दिली.तासगाव पोलीस घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाला पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोलापूरमध्येही रस्त्यावर अर्भक सोडल्या प्रकरणी चार जणांना अटक

अल्पवयीन मुलीला माता बनवून अपत्य रस्त्यावर फेकून दिलेल्या प्रकारणी तिसरा अत्याचारी नराधम देखील गजाआड करण्यात आला. पोलिसांनी कराड येथून ताब्यात घेतले आहे. तासा दोन तासापूर्वी जन्मलेल्या नवजात पुरुष जातीचे बाळ रस्त्याच्या मधोमध सोडून पलायन करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन पिडीत मुलीबरोबर तिघांनी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यामुळे त्या मुलाचा पिता कोण हे ठरवणे मुश्किल झाले आहे. तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण उर्फ भैय्या शशिकांत दावणे व दत्ता परमेश्वर खरे या दोन तरुणांना अटक केली होती. तर तिसऱ्यांचा शोध सुरु होता. दरम्यान तिसरा आरोपी विशाल टापरे याला पोलिसांनी कराड येथून ताब्यात घेतले आहे. (A female baby was found on the side of the road in Sangli)

इतर बातम्या

क्रूरतेचा कळस!! पारधी महिला घरासमोर फिरतेय म्हणून अंगावर सोडला कुत्रा, जखमी महिलेची Beed पोलिसात धाव

Nagpur Murders | नागपूर मार्चमध्ये रक्ताने माखले, महिनाभरात खुनाच्या 9 घटना; नातेवाईक, मित्रांनीच केला घात

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.