पाच दिवसांपूर्वी चिमुकलीला चिरडले, आता शिक्षकाचा घेतला बळी, सुरजागड लोहखनीज वाहतूक आणखी किती बळी घेणार?

पाच दिवसांपूर्वी एक अपघात झाला. यात बारा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. आज आश्रमशाळेतील शिक्षक अपघातात ठार झाले.

पाच दिवसांपूर्वी चिमुकलीला चिरडले, आता शिक्षकाचा घेतला बळी, सुरजागड लोहखनीज वाहतूक आणखी किती बळी घेणार?
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 5:57 PM

व्येंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : सुरजागड लोहखनीज वाहतुकीमुळे या रस्त्यावरील नागरिक भयभित आहेत. दोन-चार दिवसांआड अपघात होत असतात. रस्ता अरुंद आहे. गावातून नेताना ट्रक व्यवस्थित चालवला जाणे गरजेचे आहे. पण, लवकरात लवकर जाण्याच्या घाईने या रस्त्यावर अपघात होत असतात. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच दिवसांपूर्वी एक अपघात झाला. यात बारा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. आज आश्रमशाळेतील शिक्षक अपघातात ठार झाले. या सर्व घटनांमुळे परिसरातील नागरिक परेशान झाले आहेत. आणखी किती जणांचा बळी हे ट्रक घेतील, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

आलापल्ली येथे दुर्घटना

पाच दिवसांपूर्वी आष्टी येथे एका १२ वर्षीय मुलीला ट्रकने चिरडले. सुरजागड लोहखनीज वाहतुकीने आज पुन्हा एका शिक्षकाचा बळी घेतला आहे. वासुदेव कुळमेथे (वय ४९ वर्षे, रा. गोमनी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. हा अपघात आलापल्ली येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर घडला. यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

मागून येणाऱ्या ट्रकने उडवले

शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. काटेपल्ली येथील भगवंतराव आश्रम शाळेत शिक्षक असलेले वासुदेव कुळमेथे हे आपल्या दुचाकीने चंद्रपूर मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून जात होते. दरम्यान, मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रकचालकाला पकडून ठेवले

हा अपघात आलापल्ली येथील मुख्य चौकात घडल्याने ट्रकचालकाला नागरिकांनी पकडून ठेवले होते. सुरजागड येथून लोहखनीज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे ते शहरातूनदेखील भरधाव जात असतात. त्यामुळे या मार्गावर कायम अपघाताचा धोका असतो.

लोहखनीज वाहतूक आणखी किती बळी घेणार

काही दिवसांपूर्वी असेच एका अवजड वाहनाने आष्टी येथे १२ वर्षीय मुलीला चिरडले होते. आता निर्दोष शिक्षकाला जीव गमवावा लागला. त्यामुळे सुरजागड लोहखनीज वाहतूक आणखी किती बळी घेणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.