Virar Car : विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकाची कार वाळूत रुतली, व्हिडिओ व्हायरल
रविवारी दुपारी भिवंडीतून दोन कारमध्ये हौशी पर्यटक मौजमजा करण्यासाठी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आले होते. किनाऱ्यावरील आपली हौस भागविण्यासाठी अर्नाळा ते राजोडी समुद्र किनाऱ्यावर भरगाव वेगात कार पळवत होते. स्थानिक नागरिकांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. सायंकाळी 5 च्या सुमारास अचानक भरतीचे पाणी वाढले असता चक्क चारचाकी गाडी वाळूत रुतून बसली आणि त्यांची तारांबळ उडाली.
विरार : अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या पाण्यात एका पर्यटकाची चारचाकी गाडी (Car) वाळूत रूतली असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे. रविवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली असून, समुद्र किनाऱ्यावरील एका जागरूक नागरिकाने दूर अंतरावरून हा कार रुतल्याचा व्हिडिओ (Video) आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून कारला बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याने समाधान व्यक्त होत आहे. दोन दिवसानंतर कार वाळूत रुतलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने किनाऱ्यावर अतिउत्साही असणाऱ्या पर्यटकांचे पितळ उघडे पडले आहे.
भरधाव वेगात कार पळवत असताना वाळूत रुतली
रविवारी दुपारी भिवंडीतून दोन कारमध्ये हौशी पर्यटक मौजमजा करण्यासाठी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर आले होते. किनाऱ्यावरील आपली हौस भागविण्यासाठी अर्नाळा ते राजोडी समुद्र किनाऱ्यावर भरगाव वेगात कार पळवत होते. स्थानिक नागरिकांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. सायंकाळी 5 च्या सुमारास अचानक भरतीचे पाणी वाढले असता चक्क चारचाकी गाडी वाळूत रुतून बसली आणि त्यांची तारांबळ उडाली. अर्नाळा, राजोडी, कळंब या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी आनंद घ्यावा पण अतिउत्साहीपणा दाखवू नये, अन्यथा आपला मोठा अपघात होऊ शकतो हेच या कारच्या व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. (A tourists car stuck into the sand on Virars Arnala beach)