Virar Firing : विरारमध्ये तरुणावर दुसऱ्यांदा गोळीबार, हल्ल्यात युवक गंभीर जखमी

आसाराम राठोड याचा प्रेमविवाह झाला आहे. याच प्रेम विवाहाच्या रागातून त्याच्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यात आसाराम याच्या पोटात दोन गोळ्या मारुन आरोपी फरार झाले. एक वर्षापूर्वीही आसारामवर गोळीबार करण्यात आला होता.

Virar Firing : विरारमध्ये तरुणावर दुसऱ्यांदा गोळीबार, हल्ल्यात युवक गंभीर जखमी
विरारमध्ये तरुणावर दुसऱ्यांदा गोळीबार, हल्ल्यात युवक गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 11:54 PM

विरार : विरारमध्ये गोळीबाराचं सत्र काही केल्या थांबत नाही. आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान विरारच्या बर्फ पाडा येथे दोनच दिवसात दुसरी गोळीबारा (Firing)ची घटना घडली आहे. या हल्ल्यात संबंधित गंभीर जखमी (Seriously Injured) झाला आहे. आसाराम सदाशिव राठोड असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमीवर विरारमधील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी आसाराम राठोड हा मूळचा परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भाबळे सांगावी येथील रहिवासी आहे. आसारामवर याआधीही एक वर्षापूर्वी हल्ला करण्यात आला होता. (A young man was shot twice in Virar and seriously injured in the attack)

पीडित युवकावर दुसऱ्यांदा झाला हल्ला

आसाराम राठोड याचा प्रेमविवाह झाला आहे. याच प्रेम विवाहाच्या रागातून त्याच्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यात आसाराम याच्या पोटात दोन गोळ्या मारुन आरोपी फरार झाले. एक वर्षापूर्वीही आसारामवर गोळीबार करण्यात आला होता. मात्र यात त्याचा जीव वाचला होता. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

विरारमध्ये शनिवारीही झाला होता गोळीबार

विरार पूर्व डीमार्ट जवळ दिवसाढवळ्या 4 गोळ्या फायर करून, समय चौहान याची शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास निर्घृणपणे हत्या करण्यात आली. बांधकाम व्यावसायिक निशांत कदम यांची सप्टेंबर 2021 मध्ये हत्या झाली होती. याच हत्येचा बदला गोळीबार करून घेतला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेत विरार पोलीस ठाण्यात 302, 120 (ब), तसेच शस्त्र अधिनियम 3, 25, 27 प्रमाणे विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समरजीत उर्फ समय विक्रमसिंह चौहान असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुदेश चौधरी, निखिल कदम, सिद्धार्थ कदम, श्याम यादव, अनुराग पांडे, राज यादव, राहुल दुबे, असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत. (A young man was shot twice in Virar and seriously injured in the attack)

इतर बातम्या

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, पोलिस अधिकारी गंभीर जखमी

Ahmednagar : अहमदनगर रुग्णालय आग प्रकरण, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणांना अटक आणि सुटका

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.