Akola Murder : अकोल्यात रात्री युवकाची हत्या, आधी चाकूने भोसकले नंतर दगडाने ठेचले
विनोद टोंबरे या युवकाची हत्या करण्यात आली. सुरुवातीला विनोदला चाकूने भोसकण्यात आलं. त्यानंतर दगडानं ठेचून ही हत्या करण्यात आली.
अकोला : अकोला शहरात रात्री थरारक घटना घडली. एका युवकाची हत्या करण्यात आली. सुरुवातीला त्याला चाकूने भोसकण्यात आले. त्यानंतर दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. विनोद टोंबरे असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. रात्रीच्या घटनेमुळं पोलीस सतर्क झाले आहेत. शहरातल्या न्यू तापडिया नगरमधल्या गणपती मंदिरासमोर (Ganapati Temple) ही घटना घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. सिव्हिल लाईन्स (Civil Lines) पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हत्या झालेला युवक हा पंचशीलनगर (Panchsheel Nagar) येथील रहिवासी आहे.
नेमकं काय घडलं
जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विनोद टोंबरे या युवकाची हत्या करण्यात आली. सुरुवातीला विनोदला चाकूने भोसकण्यात आलं. त्यानंतर दगडानं ठेचून ही हत्या करण्यात आली. ही घटना गणपती मंदिरासमोर घडली. सिव्हिल लाईन्स पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
लोकांमध्ये भीतीचं वातावरण
या हत्येच्या घटनेनं परिसर हादरला आहे. लोकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. कोणत्या कारणानं ही हत्या झाली, हे सांगण्याची हिंमतदेखील लोकांमध्ये दिसून येत नाही. याचा अर्थ आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं सांगितलं जातं. तपासानंतर हत्या करण्याचे कारण काय, ही हत्या कोणी केली हे समोर येईल.