कर भरा आणि वर्षभर फुकटात दळून न्या ! करवसुलीसाठी ग्रामपंचायतीची भन्नाट कल्पना

या योजनेची अंमलबजावणी सुरु करीत चक्क ग्रामपंचायतीच्या आवारात आटाचक्की लावली आहे. (Abandoned idea of Gram Panchayat for tax collection in bhandara)

कर भरा आणि वर्षभर फुकटात दळून न्या ! करवसुलीसाठी ग्रामपंचायतीची भन्नाट कल्पना
करवसुलीसाठी ग्रामपंचायतीची भन्नाट कल्पना
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 10:33 PM

भंडारा : कोरोना महामारीचा केवळ राज्य आणि देशाच्याच अर्थव्यवस्थेची घडी विस्कळीत झाली असे नाही, तर अगदी तळागाळातही याचा फटका बसला आहे. गावच्या ग्रामपंचायतींचेही बजेट कोलमडले आहे. लोकांच्या हातात पैसाच येत नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची कर वसुली खोळंबली आहे. ही कर वसुली करण्यासाठी वेगवेगळी पावले उचलली जात आहेत. भंडारा जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने तर ‘कर भरा आणि वर्षभर फुकटात दळून न्या’ अशी भन्नाट कल्पना राबवली आहे. ही कल्पना ग्रामपंचायतीच्या पथ्यावर पडली आहे, त्यामुळे या कल्पनेची अख्ख्या जिल्ह्यात चर्चा झाली नाही तर नवल. (Abandoned idea of Gram Panchayat for tax collection in bhandara)

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स

आपण याआधी हे पाहिलेय कि एखादी वस्तू विक्री करण्यासाठी व्यापारी- दुकानदार अनेक भन्नाट योजनांची घोषणा करतात, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. याच धर्तीवर भंडारा जिल्ह्यातील हरदोली ( झंझाळ) या गावच्या ग्रामपंचायतीने करवसुलीसाठी भन्नाट योजना राबवली आहे. नागरिकांनी थकीत कर भरल्यास वर्षभराचे दळण मोफत दळून दिले जाईल, असे ग्रामपंचायतीने जाहीर केले आहे, किंबहुना या योजनेची अंमलबजावणी सुरु करीत चक्क ग्रामपंचायतीच्या आवारात आटाचक्की लावली आहे.

ग्रामपंचायतीतर्फे नविन शक्कल

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील 2 हजार लोकसंख्येचे हरदोली ( झंझाळ) हे गाव. ह्या गावात लोकांनी कर थकविल्याने तब्बल 9 लाख रुपयांचा कर थकीत होता. ग्रामपंचायतीने वारंवार नागरिकांना कर भरण्यासाठी आवाहन केले. मात्र गावातील नागरीक ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत नव्हते, ते कर भरायला तयार नव्हते. त्यामुळे नेमके करायचे काय, हा प्रश्न ग्रामपंचायतीला सतावत होता. ग्रामपंचायतीला कर मिळत नसल्याने गावाचा विकास खुंटला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीतर्फे एक नविन शक्कल लढवत ग्रामपंचायतीच्या आवारात एक आटाचक्की लावण्यात आली आहे.

जे नागरीक घराचा कर नियमित भरत असतील, त्यांना वर्षभर मोफत दळून देण्याचे ग्रामपंचायतीने जाहिर केले आहे. मग काय लोकांनी फुकटात वर्षभर दळण मिळणार म्हणून कर भरायला सुरुवात केली आहे. याचे करवसुलीमध्ये सकारात्मक चित्र दिसून आले असून आतापर्यंत 252 कुटुंबांनी आपला थकीत कर भरल्याने ग्रामपंचायतीच्या तिजोरीत 6 लाख 27 हजार रुपयांची भर पडली आहे. त्यामुळे आता गावाचा विकास सुसाट होणार असल्याची समाधानाची प्रतिक्रिया ग्रामसेवक गोपाल बुरडे यांनी दिली आहे. (Abandoned idea of Gram Panchayat for tax collection in bhandara)

इतर बातम्या

मुंबई पोलिसांच्या चौकशीनंतर नामांकित बिल्डर परांजपे बंधूंची अखेर सूटका, कौटुंबिक कलह उघड

“फडणवीस माझे गॉडफादर”, कर्नाटकच्या आमदाराचा राजीनामा देण्यास नकार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.