नंदुरबार जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले; वर्षभरात अपघातात 207 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या उपाययोजना काय?

नंदुरबार जिल्ह्यातील खराब आणि अपुऱ्या कामामुळे अपघाताचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. यावर नियंत्रण केव्हा मिळेल, हा प्रश्नच आहे.

नंदुरबार जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले; वर्षभरात अपघातात 207 जणांचा मृत्यू, पोलिसांच्या उपाययोजना काय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 1:39 PM

नंदुरबार : जिल्ह्यात मागील वर्षात जिल्ह्यात 207 नागरिकांना अपघातामध्ये (207 civilians in the accident) जीव गमवावा लागला आहे. अपघात कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या (Police administration) वतीने उपाययोजना करण्यात आल्यात. मात्र, महामार्ग आणि पीडब्ल्यूडी विभाग फक्त नावाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातून (From Nandurbar district) जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग मात्र या महामार्गाची अत्यंत परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र पोलीस प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत अपघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे.

300 पेक्षा अधिक मद्यपींवर कारवाई

पोलीस विभागाने दिलेले माहितीनुसार जिल्ह्यात 2021 या वर्षात 275 अपघात झालेत. त्यात 207 लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे तर 360 लोकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. पोलीस दलाच्या वतीने अपघात स्थळाचा अभ्यास करण्यात आला. त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अनेक अपघातात वाहनचालकाने मद्यप्राशन केल्याचे समोर आले. त्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात 300 पेक्षा अधिक मद्यपी चालकांवर परवाना रद्द करण्याची कारवाई पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली.

अपघातातील महत्त्वाचे मुद्दे

नंदुरबार जिल्ह्यात सन 2021 मध्ये झालेल्या अपघातांची संख्या – 275 इतकी आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या – 207 इतकी, तर गंभीर जखमी झालेल्यांची संख्या – 360 इतकी आहे. अपघात स्थळाचा अभ्यास करून त्या ठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात आलेत. जिल्ह्यात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या तीनशेपेक्षा अधिक चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. नंदुरबार जिल्ह्यातील खराब आणि अपुऱ्या कामामुळे अपघाताचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. जिल्ह्यात अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. यावर नियंत्रण केव्हा मिळेल, हा प्रश्नच आहे.

Nagpur Crime | नागपुरात विजेचा शॅाक लागून बिबट्याचा मृत्यू; शेतात विद्युत करंट लावण्याचे कारण काय?

Nagpur | एका सुरेल युगाचा अंत; लतादीदींच्या निधनावर डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला शोक

नागपुरातील रस्त्यांच्या सफाईसाठी मेकॅनिकल रोड स्विपिंग मशीन; रात्रीच्या वेळी होणार प्रमुख मार्गांची स्वच्छता

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.